भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रावर चीनी ड्रॅगनचा 'हल्ला'; स्मार्टफोन बाजारात अशीच केलेली घुसखोरी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2019 04:41 PM2019-11-14T16:41:12+5:302019-11-14T16:42:35+5:30

भारताला सध्या परदेशी कंपन्यांकडून गुंतवणुकीची गरज आहे. यामुळे एकीकडे आनंदाची बातमी असली तरीही मारुती, टाटा, महिंद्रासह अन्य भारतीय कंपन्यांना मोठे आव्हान मिळणार आहे.

Chinese dragon is ready to 'attack' on Indian automobile sector; Similar entry in the smartphone market | भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रावर चीनी ड्रॅगनचा 'हल्ला'; स्मार्टफोन बाजारात अशीच केलेली घुसखोरी

भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रावर चीनी ड्रॅगनचा 'हल्ला'; स्मार्टफोन बाजारात अशीच केलेली घुसखोरी

Next

नवी दिल्ली : देशातील ऑटोमोबाईल कंपन्या मंदीच्या प्रभावातून जात आहेत. यामुळे त्यांच्या वाहनांवर मोठ्या प्रमाणात डिस्काऊंट देत असून याचा फायदा घेण्याच्या तयारीत चीनी ड्रॅगन आहे. भारतीय बाजारपेठेवर चीनच्या एक दोन नव्हे तर तब्बल सात कंपन्यांचा डोळा आहे. यापैकी एक कंपनी एमजी मोटर्सने आधीच चंचूप्रवेश केला असून टाटा, मारुतीसारख्या कंपन्यांना नामोहरम केले आहे. महत्वाचे म्हणजे स्मार्टफोन बाजारात चीनने अशीच घुसखोरी केली आहे. 


भारताला सध्या परदेशी कंपन्यांकडून गुंतवणुकीची गरज आहे. यामुळे एकीकडे आनंदाची बातमी असली तरीही मारुती, टाटा, महिंद्रासह अन्य भारतीय कंपन्यांना मोठे आव्हान मिळणार आहे. एमजी हेक्टर वगळल्यास अर्धा डझन चीनी कंपन्या भारताचा दरवाजा ठोठावत आहेत. धक्कादायक म्हणजे काही भारतीय कंपन्याच या चीनच्या कंपन्यांना भारतात पाऊल ठेवण्यास मदत करत आहेत. यामध्ये प्रामुख्याने टाटा आणि आयशर या दोन कंपन्या आहेत. पुढील तीन ते पाच वर्षांत या कंपन्या भारतात पाच अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार आहेत. 


चीनच्या कंपन्यांमध्ये MG Motors, BYD, Great Wall Motors, Changan आणि Beiqi Foton या कंपन्या भारतात गुंतवणूक वाढविण्याच्या तयारीत आहेत. एवढेच नाही तर त्यांचे चीनमधील व्हेंडर म्हणजेच सुटे भाग पुरविणारेही भारतात दाखल होण्याच्या तयारीत आहेत. याशिवाय Geely आणि Chery Scout या दोन मोठ्या कंपन्याही भारतीय बाजारपेठेकडे कूच करण्याच्या तयारीला लागल्या आहेत. 

ईकॉनॉमिक टाईम्सनुसार MG Motors ची मालकी चीनच्या SIAC कडे आहे. या कंपनीकडे जगभरातील जवळपास 30 हून अधिक ब्रँड आहेत. MG Motors लवकरच ईलेक्ट्रीक कार लाँच करणार आहे. यानंतर लगेचच गुंतवणूक वाढविणार आहे. BYD बस तसेच इलेक्ट्रीक व्हॅन बनविणार आहे. Great Wall Motors ने गुडगावमध्ये कार्यालय उघडले आहे. ही कंपनी लवकरच एसयुव्ही आणणार आहे. याचबरोबर जनरल मोटर्सची तळेगावची फॅक्टरी खरेदी करण्याची चर्चाही अंतिम टप्प्यात आहे. 


भारतीय कंपन्यांकडूनच रेड कार्पेट
Geely कंपनी टाटा मोटर्सच्या जेएलआरमध्ये हिस्सेदारी खरेदी करणार आहे. नेशनल हैवी ड्यूटी ट्रक ग्रुप कंपनीने मुंबईच्या आयशर कंपनीसोबत ट्रक बनविण्याचा करार केला आहे. ही कंपनी Sinotruk नावाने ट्रक बनविते. Beiqi Foton कंपनीने उत्तर भारतातील पीएमएलसोबत करार केला आहे. फोटोनने पुण्यातील चाकणमध्ये जमीन खरेदी केली आहे. 

Web Title: Chinese dragon is ready to 'attack' on Indian automobile sector; Similar entry in the smartphone market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.