शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
2
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
3
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
4
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
5
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
6
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
7
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
8
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
9
पाकिस्तानला T20 World Cup साठी संघ जाहीर करण्याचा मुहूर्त सापडला; तरीही गडबड केलीच
10
राजस्थान रॉयल्सने केले 'Boult' टाईट, पण सनरायझर्स हैदराबादने दाखवला 'Klaas'en! 
11
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
12
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
13
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
14
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
15
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
16
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
17
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
18
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
19
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
20
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री

Chevrolet लवकरच लॉन्च करणार शानदार इलेक्ट्रिक कार, टीझर रिलीज; जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2022 4:42 PM

Chevrolet ने नुकतीच पूर्ण इलेक्ट्रिक कार लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. या इलेक्ट्रीफाईड कारचे नाव कॉर्व्हेट (Corvette) असेल, जी पुढील वर्षी बाजारात येऊ शकते.

नवी दिल्ली : जनरल मोटर्स कंपनी ही एक अमेरिकन ऑटोमेकर कंपनी आहे, जी आपली वाहने अनेक ब्रँड अंतर्गत विकते. कंपनीचे मुख्यालय अमेरिकेतील डेट्रॉईट, मिशिगन येथे आहे. ही कंपनी अमेरिकेतील सर्वात मोठी ऑटोमोबाईल उत्पादक आणि जगभरातील सर्वात मोठी कंपनी आहे. शेवरले (Chevrolet) हा देखील या कंपनीचा ब्रँड आहे.

2017 मध्ये Chevrolet भारतीय बाजारातून बाहेर पडली होती. दरम्यान, Chevrolet ने नुकतीच पूर्ण इलेक्ट्रिक कार लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. या इलेक्ट्रीफाईड कारचे नाव कॉर्व्हेट (Corvette) असेल, जी पुढील वर्षी बाजारात येऊ शकते. या मॉडेलसह Chevrolet बाजारात पुनरागमन करू शकते.

हायब्रिड एडिशनचे संकेतऑल-व्हील-ड्राइव्ह सेट-अप टीझर व्हिडिओमध्ये पाहिले जाऊ शकते आणि बॅकग्राउंड V8 इंजिनचा नॉइज आहे, जो हायब्रिड एडिशनचे संकेत देत आहे. जनरल मोटर्सचे सीईओ मार्क रीस यांनी देखील लिंक्डइनवर पुष्टी केली आहे की, पहिले इलेक्ट्रीफाईड कॉर्व्हेट 2023 मध्ये लॉन्च होणार आहे आणि इलेक्ट्रिक एडिशन जीएमच्या नवीन अल्टियम प्लॅटफॉर्मवर तयार केले जाईल.

कॉर्व्हेट ई-रे नावाचा ट्रेडमार्क वापरला जाण्याची शक्यतापहिल्या इलेक्ट्रीफाईड कॉर्व्हेटमध्ये सध्याच्या इंजिनच्या संयोगाने काम करणारी एक छोटी बॅटरी असेल, ज्याची पुढची चाके ट्विन मोटर्सद्वारे विजेवर चालतात, तर V8 मागील बाजूस असेल. दरम्यान, दोन्ही गाड्यांची अधिकृत नावे अद्याप जाहीर झालेली नाहीत. Chevrolet ने 2015 मध्ये कॉर्व्हेट ई-रे नावाचा ट्रेडमार्क केला होता आणि तो कदाचित इलेक्ट्रिक एडिशनसाठी वापरला जाईल.

येत्या काही दिवसांत अधिक माहिती मिळण्याची शक्यताकॉर्व्हेटच्या इलेक्ट्रीफाईड एडिशनसाठी 2019 मध्ये C8 जनरेशन लाँच करताना पहिल्यांदा संकेत दिले होते, ज्यामध्ये सूत्रांनी सांगितले की पॉवरट्रेन इलेक्ट्रिकला परवानगी देण्यासाठी डिझाइन करण्यात आली होती. दरम्यान, येत्या काही महिन्यांत नवीन Chevrolet कॉर्व्हेट मॉडेलबद्दल अधिक माहिती मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

टॅग्स :AutomobileवाहनChevroletशेवरोले