एकदा चार्ज करा अन् १७००KM पर्यंत पळवा! चिनी कंपनीनं सादर केली ढासू हायब्रिड SUV, जाणून घ्या किंमत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2026 12:04 IST2026-01-18T12:03:42+5:302026-01-18T12:04:43+5:30
ही कार एकदा संपूर्ण चार्ज केल्यानंतर, तब्बल १७०४ किलोमीटरपर्यंत रेंज देऊ शकते, असा दावा कंपनीने केला आहे. अर्थात दिल्लीहून मुंबईपर्यंतचे अंतर एका फूल चर्जमध्ये सहजपणे पूर्केण केले जाऊ शकेल...

एकदा चार्ज करा अन् १७००KM पर्यंत पळवा! चिनी कंपनीनं सादर केली ढासू हायब्रिड SUV, जाणून घ्या किंमत
एक्सपेंग मोटर्स या चिनी इलेक्ट्रिक कार कंपनीने ऑटोमोबाइल इंडस्ट्रीमध्ये मोठा धमाका केला आहे. कंपनीने आपली नवी G७ SUV चे हाइब्रिड व्हर्जन सादर केले आहे. ही कार एकदा संपूर्ण चार्ज केल्यानंतर, तब्बल १७०४ किलोमीटरपर्यंत रेंज देऊ शकते, असा दावा कंपनीने केला आहे. अर्थात दिल्लीहून मुंबईपर्यंतचे अंतर एका फूल चर्जमध्ये सहजपणे केले जाऊ शकेल. तर या कारसंदर्भात सविस्तर जाणून घेऊयात...
कारची किंमत -
G७ ही जगातील सर्वाधिक रेंज देणारी SUV बनली आहे. या कारला ५५.8 kWh बॅटरीसह ६० लिटरचा एक फ्यूअल टँक देण्यात आला आहे. याशिवाय, कारमध्ये एक छोटे पेट्रोल इंजिनही देण्यात आले आहे. जे कार चालवण्या एवजी बॅटरी चार्ज करते. या कारची सुरुवातीची किंमत साधारणपणे २८ हजार डॉलर अर्थात २३.५ लाख रुपये एवढी आहे.
या एसयूव्हीसोबतच, कंपनीने पी७+ सेडान देखील सादर केली. या कारची रेंज १,५५० किलोमीटर असण्याचा अंदाज आहे. तसेच, तिची किंमत २७,००० डॉलर म्हणजेच, अंदाजे २२.६ लाख रुपयांपासून सुरू होते. गेल्या वर्षी एक्सपेंगने ४२९,००० पेक्षा जास्त वाहने विकली, जी मागील वर्षीच्या विक्रीपेक्षा दुप्पट आहे.