शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
2
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
3
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
4
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
5
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
6
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
7
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
8
NCB-ATS ची मोठी कारवाई, 600 कोटी रुपयांच्या 86 किलो ड्रग्जसह 14 पाकिस्तानींना अटक
9
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
10
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
11
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
12
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
13
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
14
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
15
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
16
न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने कशीबशी लाज राखली
17
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
18
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
19
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
20
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत

भारतात जानेवारी 2022 पासून गाड्या महागणार? कंपन्या किमती वाढवण्याच्या तयारीत 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2021 7:35 PM

Cars : भारतातील बहुतांश कंपन्या त्यांच्या वाहनांच्या किमती वाढवण्याच्या तयारीत आहेत. ET Auto च्या मते, जानेवारी 2022 पासून कारच्या किमती वाढू शकतात.

नवी दिल्ली : चालू वर्ष वाहन उत्पादकांसाठी अत्यंत वाईट ठरले आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे ऑटोमोबाईल क्षेत्रात मंदीचे सावट होते. दरम्यान, भारतात सणासुदीचा हंगाम वाहन उत्पादकांसाठी नेहमीच चांगला असतो. मात्र, यावेळी सेमीकंडक्टर चिप्सच्या कमतरतेमुळे, मागणी करूनही कंपन्या त्या पूर्ण करण्यास विलंब करत आहेत. यानंतर आता पुढील वर्ष ग्राहकांसाठी निराशाजनक ठरू शकते.

भारतातील बहुतांश कंपन्या त्यांच्या वाहनांच्या किमती वाढवण्याच्या तयारीत आहेत. ET Auto च्या मते, जानेवारी 2022 पासून कारच्या किमती वाढू शकतात. दरम्यान, गेल्या काही वर्षांपासून, कार उत्पादकांमध्ये हा ट्रेंड कायम आहे, ज्यामध्ये नवीन वर्ष येताच जवळजवळ सर्व कंपन्या कारच्या किमती वाढवतात. या कंपन्यांमध्ये मारुती सुझुकी ( Maruti Suzuki), ह्युंडाई (Hyundai)आणि एमजी (MG) या कंपन्यांचा समावेश आहे. जागतिक चिपच्या तुटवड्याव्यतिरिक्त, किंमतीतील वाढ हे देखील कारच्या किमती वाढण्याचे मुख्य कारण आहे.

जानेवारी 2022 मध्ये वाढ अपेक्षित मारुती सुझुकी सारख्या दिग्गज वाहन उत्पादक कंपनीने 2021 मध्येच आपल्या वाहनांच्या किमती तीनदा वाढवल्या आहेत आणि जानेवारी 2022 मध्ये संभाव्य वाढ त्याच्या किमती आणखी वाढवणार आहे. किमती वाढण्याचे आणखी एक कारण म्हणजे लवकरच लागू होणारा CAFE2 नियम, ज्यामध्ये कार निर्मात्यांना त्यांचे सरासरी Co2 उत्सर्जन 113 g/kg ने कमी करावे लागेल. त्यामुळे आता या तीन कारणांचा हवाला देऊन बहुतेक कंपन्या जानेवारी 2022 पासून त्यांच्या कारच्या किमती वाढवू शकतात.

टॅग्स :Automobileवाहनbusinessव्यवसाय