'या' तीन अॅडव्हॉन्स टेक्नॉलॉजीमुळं कार पार्किंग करणं होतं सोपं!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 12:23 IST2025-01-04T12:19:58+5:302025-01-04T12:23:14+5:30
Car Parking Tips : बऱ्याच वेळा अनुभवी चालकांनाही दोन वाहनांमध्ये कार पार्क करताना अडचणी येतात.

'या' तीन अॅडव्हॉन्स टेक्नॉलॉजीमुळं कार पार्किंग करणं होतं सोपं!
Car Parking Tips : अनेकांना कार चालवायला आवडत असेल. मात्र, कार पार्क करण्याची वेळ आली, अनेकांना घाम फुटू लागतो. कारण अनेक वेळा दोन वाहनांच्या मधल्या रिकाम्या जागेत कार पार्किंग करावी लागते, तर काही वेळा कार नवीन शिकणाऱ्यांना पार्किंग करताना अडचणींचा सामना करावा लागतो.
बऱ्याच वेळा अनुभवी चालकांनाही दोन वाहनांमध्ये कार पार्क करताना अडचणी येतात. अशा परिस्थितीत आता अॅडव्हॉन्स टेक्नॉलॉजीमुळे कार चालकाच्या या अडचणी सोप्या झाल्या आहेत. टेक्नॉलॉजी ही एक कमाल गोष्ट आहे, ज्यामुळे चालकांसाठी कार पार्किंग करणे खूप सोपे झाले आहे. तुमच्या कारमध्ये कोणती टेक्नॉलॉजी बसवली जाऊ शकते? त्यामुळे तुम्ही सहज कार पार्क करू शकाल, याबाबत जाणून घ्या...
Car Parking Sensors
मार्केटमध्ये अशा अनेक कार आहेत, ज्यामध्ये रिअरसह फ्रंट पार्किंग सेन्सर मिळतात. जर फ्रंट पार्किंग सेन्सर सध्या फक्त निवडक मॉडेल्समध्ये मिळत असले तरी, तुम्हाला बहुतेक वाहनांमध्ये रिअर पार्किंग सेन्सर मिळतील. जर तुमच्या कारमध्ये कार सेन्सर नसेल, तर तुम्ही मार्केटमधून किंवा कंपनीच्या अधिकृत सेंटरतून पार्किंग सेन्सर लावू शकता. तुम्ही कार पार्क करत असताना रिअर पार्किंग सेन्सरचे काम सुरू होते, जर कारजवळ कोणतीही वस्तू किंवा भिंत येऊ लागली, तर कारमध्ये बसवलेला हा सेन्सर मोठा आवाज करू लागतो.
Car Parking Camera
रिअर पार्किंग सेन्सर आणि रिअर पार्किंग कॅमेऱ्यामध्ये फरक एवढाच आहे की, जर कारला टक्कर झाली तर सेन्सर मोठा आवाज करू लागतो. त्याचवेळी, रिअर पार्किंग कॅमेरा चालकाला स्क्रीनवर मागील दृश्य दाखवतो, ज्यामुळे कार पार्किंग करणे खूप सोपे होते. जर कारमध्ये हे फीचर नसेल तर तुम्ही बाहेरूनही कॅमेरा लावू शकता.
360 Degree Camera
सध्या अशी अनेक वाहने आहेत, जी कमी किमतीतही 360 डिग्री कॅमेरा फीचर देत आहेत. हे एक महत्त्वाचे फीचर आहे, जे कार चालकांना खूप मदत करते. या फीचरच्या मदतीने कारमध्ये बसल्यावर कारच्या आजूबाजूचे दृश्य स्क्रीनवर दिसू लागते, ज्यामुळे कार पार्क करणे अधिक सोपे होते.