होंडाची अॅक्टिव्हा घेण्यासाठी पठ्ठ्याने असे काही केले.... पाहून डीलरलाच घाम फुटला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2019 13:09 IST2019-10-27T13:07:34+5:302019-10-27T13:09:48+5:30
निवडणुकीच्या काळात उमेदवारांनी अर्जभरताना 5, 10 हजाराची चिल्लर दिल्याच्या बातम्या आपण वाचतो.

होंडाची अॅक्टिव्हा घेण्यासाठी पठ्ठ्याने असे काही केले.... पाहून डीलरलाच घाम फुटला
नवी दिल्ली : धनत्रयोदशी आणि दिवाळी सणाला आपण काही ना काही वस्तू, वाहन घेत असतो. राकेश कुमार गुप्ता नावाच्या व्यक्तीने दिवाळीच्या मुहुर्तावर Honda Activa खरेदी केली. मात्र, त्याने जे केले ते पाहून डीलरशिपच्या कर्मचाऱ्यांना घाम फुटला.
निवडणुकीच्या काळात उमेदवारांनी अर्जभरताना 5, 10 हजाराची चिल्लर दिल्याच्या बातम्या आपण वाचतो. यामुळे निवडणूक कर्मचाऱ्यांची ते पैसे मोजेपर्यंत दमछाक होते. यामुळे प्रसारमाध्यमांतून आयती प्रसिद्धीही मिळते. असाच काहीसा प्रकार सतनामध्ये घडला आहे.
तेथील पन्ना नाका येथील कृष्णा होंडा या शोरुममध्ये धनत्रयोदशीच्या दिवशी गुप्ता यांनी अॅक्टिव्हा विकत घेतली. यासाठी त्यांनी ऑन रोड किंमत असलेली 83 हजाराची रक्कम चिल्लरमध्ये दिली. या रकमेच्या थैल्या पाहून शोरुमच्या मालकासह कर्मचाऱ्यांना हसावे की रडावे हेच समजेनासे झाले. शेवटी त्यांनी ही चिल्लर मोजण्याचे ठरविले.
गुप्ता यांनी सांगितले की इतरांसारखाच दिवाळी हा सण माझ्या कुटुंबासाठी पवित्र आहे. या मुहूर्तावर अॅक्टिव्हा घेण्याचे ठरविले होते. कारण रोजच्या येण्याजाण्यासाठी दुसरा पर्याय नव्हता. मात्र हा आनंदाचा क्षण अनुभवण्यासाठी एवढे पैसे चिल्लरमध्ये जमविले. हे पैसे मोजण्यासाठी मलाही वेळ लागला.
खरी मजा तर तेव्हा आली जेव्हा कर्मचाऱ्यांनी हे पैसे मोजायला घेतले. ही चिल्लर मोजण्यासाठी त्यांना तीन तासांची आकडेमोड करावी लागली. शेवटी तीन तासांनी गुप्ता यांना स्कूटरची डिलिव्हरी देण्यात आली. या चिल्लरमध्ये 5 आणि 10 रुपयांचे कॉईन जास्त होते. अन्यथा त्यांना आणखी वेळ लागला असता.