'या' कंपनीकडून 8 कार लाँच करण्याची प्लॅनिंग; जाणून घ्या काय असेल खास?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2022 06:37 PM2022-12-11T18:37:33+5:302022-12-11T18:38:33+5:30

BMW: येत्या आठ आठवड्यात आठ उत्पादने देशात सादर करण्याची कंपनीची योजना आहे.

bmw xm flagship suv launched in india check price features  | 'या' कंपनीकडून 8 कार लाँच करण्याची प्लॅनिंग; जाणून घ्या काय असेल खास?

'या' कंपनीकडून 8 कार लाँच करण्याची प्लॅनिंग; जाणून घ्या काय असेल खास?

Next

नवी दिल्ली : लक्झरी कार कंपनी बीएमडब्ल्यू इंडियाची (BMW) 2023 मध्ये देखील विक्रीत चांगली कामगिरी असण्याची शक्यता आहे. तसेच, कंपनी इलेक्ट्रिक सेडान I7 सह अनेक उत्पादने विकण्याची शक्यता शोधत आहे. बीएमडब्ल्यू ग्रुप इंडियाचे अध्यक्ष विक्रम पावाह म्हणाले की, विक्रीच्या दृष्टीने हे वर्ष कंपनीसाठी सर्वोत्तम वर्ष ठरले आहे. येत्या आठ आठवड्यात आठ उत्पादने देशात सादर करण्याची कंपनीची योजना आहे.

एका प्रश्नाला उत्तर देताना विक्रम पावाह म्हणाले, "आम्हाला खात्री आहे की विक्रीची गती निश्चितपणे चालू राहील. आम्ही पुढील वर्षीही उत्तम उत्पादने आणणार आहोत. मी खूप सकारात्मक आहे कारण आम्ही आठ प्रमुख ऑफरसह सुरुवात करत आहोत, त्यापैकी तीन खूप मोठी उत्पादने आहेत. 2023 मध्येही आम्ही खूप मजबूत वाढ पाहणार आहोत." दरम्यान, कंपनी कार विभागातील बीएमडब्ल्यू आणि मिनी ब्रँड अंतर्गत उत्पादने आणि बीएमडब्ल्यू मोटरराड अंतर्गत बाईक विकते.

बीएमडब्ल्यूने अलीकडेच आपली फ्लॅगशिप एसयूव्ही बीएमडब्ल्यू एक्सएम भारतात लाँच केली आहे. 1978 मध्ये लाँच झालेल्या M1 नंतर एसयूव्ही हे M ब्रँड अंतर्गत दुसरे स्टँडअलोन उत्पादन आहे. भारतात कारची किंमत 2.60 कोटी रुपये (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली आहे.  एक्सएम ही M सिरिजमधील पहिली एसयूव्ही असणार आहे, जी प्लग-इन हायब्रिड टेक्नॉलॉजीसह येईल.

सर्वाधिक पॉवरफूल आहे इंजिन 
इंजिनबद्दल बोलायचे झाले तर बीएमडब्ल्यू एक्सएममध्ये 4.4-लीटर पेट्रोल इंजिन आहे. एसयूव्हीचे पॉवर आउटपुट सर्वाधिक 644 Bhp पॉवर आणि 800 Nm पीक टॉर्क आहे. कंपनीने भारतात लाँच केलेली हे सर्वात पॉवरफूल एसयूव्ही असल्याचे सांगितले जात आहे. तसेच, इंजिन 8-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनशी जोडलेले आहे आणि ते प्लग-इन हायब्रिड सिस्टम देखील आहे. बॅटरी पॅकची क्षमता 25.7 kWh आहे. विशेष म्हणजे हे इलेक्ट्रिक मोडमध्ये 88 किमी धावू शकते.

Web Title: bmw xm flagship suv launched in india check price features 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.