बीएमडब्ल्यूकडून 'BMW JOY Days' नवी ऑफर; खास सवलतीची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2021 12:31 IST2021-03-15T12:31:02+5:302021-03-15T12:31:25+5:30

या ऑफर काळात बीएमडब्ल्यू ग्राहकांना मोठमोठे फायदे देणार आहे.

BMW India has introduced their new campaign 'BMW JOY Days' | बीएमडब्ल्यूकडून 'BMW JOY Days' नवी ऑफर; खास सवलतीची घोषणा

बीएमडब्ल्यूकडून 'BMW JOY Days' नवी ऑफर; खास सवलतीची घोषणा

आलिशान कार निर्माता कंपनी बीएमडब्ल्यूने (BMW) ग्राहकांना त्यांचा मालकी हक्क द्विगुणीत करण्यासाठी 'बीएमडब्ल्यू जॉय डेज' नावाची मोहीम सुरू केली आहे. ही मोहीम 31 मार्च 2021 पर्यंत सुरू राहणार आहे.
 
या ऑफर काळात बीएमडब्ल्यू ग्राहकांना मोठमोठे फायदे देणार आहे. यामध्ये चांगल्या डील्स आणि कारच्या घटत्या किंमतीवरही दिलासा देणार आहे. नवीन कारवर 4.99 टक्के व्याजदराने कर्ज आणि शून्य डाऊन पेमेंटचा पर्याय देण्यात येत आहे. तसेच काही मोजक्या बीएमडब्ल्यू कारवर 5 लाखांपर्यंत फायदा देण्यात येणार आहे. अॅक्सेसरीजवर 50 टक्के सूटही दिली जाणार आहे.

‘Sheer Driving Pleasure' या ब्रँडच्या टॅगलाईनखाली कंपनी ग्राहकांना आनंदही प्रदान करण्यास उत्सुक आहे. याव्दारे कंपनी ग्राहकांना उत्तमोत्तम डील्स देऊ करत आहे. या डील्स बीएमडब्ल्यूच्या सर्व वाहनांवर श्रेणीनुसार उपलब्ध असणार आहेत. जर तुम्हाला बीएमडब्ल्यू कार घ्यायची असेल तर ही तुमच्यासाठी योग्य संधी आहे.

Web Title: BMW India has introduced their new campaign 'BMW JOY Days'