BMW ची सर्वात स्वस्त बाईक, लूक आणि किंमतीबाबत जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2022 01:07 PM2022-10-27T13:07:05+5:302022-10-27T13:07:36+5:30

BMW G 310 RR : डिझाईनबद्दल बोलायचे झाले तर ज्यांना स्पोर्ट्स बाईक आवडते त्यांना या बाईकची डिझाईन आवडू शकते.

bmw g 310 rr price and features | BMW ची सर्वात स्वस्त बाईक, लूक आणि किंमतीबाबत जाणून घ्या...

BMW ची सर्वात स्वस्त बाईक, लूक आणि किंमतीबाबत जाणून घ्या...

googlenewsNext

बीएमडब्ल्यू जी 310 आरआर (BMW G 310 RR) दिसायला आग्रेसिव्ह आणि स्पोर्टी दिसते. बाईकची डिझाइन  TVS 310 RR सारखी आहे. ही बाईक BMW आणि TVS च्या भागीदारीत तयार करण्यात आली आहे.  BMW G 310 RR या वर्षी जुलैमध्ये लाँच करण्यात आली आहे. ही कंपनीच्या सर्वात स्वस्त मॉडेलपैकी एक आहे. BMW G 310 RR ची किंमत 2.85 लाख रुपयांपासून सुरू होते. ही TVS Apache RR 310 (सुरुवातीची किंमत 2.65 लाख रुपये) पेक्षा जवळपास 20 हजार रुपये महाग आहे. 

BMW G 310 RR चे स्पेसिफिकेशन
बाईकमध्ये 312.12 सीसी, वॉटर-कूल्ड, सिंगल-सिलेंडर 4-स्ट्रोक इंजिन मिळते, जे 6-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. हे ट्रॅक/स्पोर्ट मोडमध्ये 9,700 आरपीएमवर 25 kW (34 PS) आणि रेन/अर्बन मोडमध्ये 7,700 आरपीएमवर 19 kW (25.8 PS) पॉवर जनरेट करू शकते, तर ट्रॅक/स्पोर्ट मोडमध्ये 700 आरपीएमवर 27.3  एनएम आणि रेन/अर्बन मोडमध्ये 6,700 आरपीएमवर 25 एनएम टॉर्क जनरेट करू शकतो. बाईकचा टॉप स्पीड ट्रॅक/स्पोर्ट मोडमध्ये 160 किमी/ताशी आहे, तर रेन आणि अर्बन मोडमध्ये 125 किमी/ताशी आहे.

BMW G 310 RR चे  डिझाईन, फीचर्स...
डिझाईनबद्दल बोलायचे झाले तर ज्यांना स्पोर्ट्स बाईक आवडते त्यांना या बाईकची डिझाईन आवडू शकते. या बाईकचे हेडलाइट एरिया अतिशय शार्प लुक देते. यामध्ये एलईडी हेडलाइट, एलईडी टेललाइट, एलईडी फ्लॅशिंग टर्न इंडिकेटर, 2 भागांमध्ये विभागलेली सीट मिळते. यासोबतच ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह 5.0-इंच टीएफटी स्क्रीन देण्यात आली आहे, यावर बाईकशी संबंधित अनेक महत्त्वाची माहिती पाहिली जाऊ शकते. BMW G 310 RR ची सीट 811 मिमी उंच आहे. तसेच, या बाईकची फ्युअल टँक 11 लीटर आहे.

Web Title: bmw g 310 rr price and features

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.