BMW C 400 GT: भारतातील सर्वात महागडी स्कूटर लाँच; जाणून घ्या किंमत आणि खासियत...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2021 05:51 PM2021-10-12T17:51:26+5:302021-10-12T17:53:20+5:30

BMW C 400 GT: पॉवरफुल इंजिन या प्रीमियम स्कूटरमध्ये 350cc, सिंगल-सिलेंडर, लिक्विड-कूल्ड इंजिन मिळू शकते

BMW C 400 GT launched in India, prices start at ₹9.95 lakh | BMW C 400 GT: भारतातील सर्वात महागडी स्कूटर लाँच; जाणून घ्या किंमत आणि खासियत...

BMW C 400 GT: भारतातील सर्वात महागडी स्कूटर लाँच; जाणून घ्या किंमत आणि खासियत...

Next

नवी दिल्ली :  बीएमडब्ल्यू मोटरराड इंडियाने (BMW Motorrad India) मंगळवारी आपली नवीन C 400 GT प्रीमियम मॅक्सी-स्कूटर भारतीय बाजारात लाँच करण्यात आली आहे.  BMW C 400 GT Maxi Scooter ची सुरूवातीची एक्स-शोरूम किंमत 9.95 लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. दरम्यान, सध्या  C 400 GT स्कूटर भारतातील सर्वात महागडी स्कूटर बनली आहे. (BMW C 400 GT launched in India, prices start at ₹9.95 lakh)

बीएमडब्ल्यू ग्रुप इंडियाचे अध्यक्ष विक्रम पावाह यांनी सांगितले की,"सर्व नवीन BMW C 400 GT चे लाँच भारतातील शहरी मोबिलीटी सेगमेंटमध्ये एका नवीन युगाची सुरुवात करते. या प्रगतिशील आणि चपळ मध्यम आकाराच्या स्कूटरला शहर आणि लांब टूरिंग डेस्टिनेशनपर्यंत सहज पोहोचण्यासाठी डिझाइन केले आहे. शहरात फिरणे असो, ऑफिसला जाणे असो किंवा वीकेंड टूरचा आनंद घेणे असो - नवीन BMW C 400 GT राइडचा पूर्ण आनंद घेण्यासाठी योग्य साथीदार आहे."

पॉवरफुल इंजिन
BMW C 400 GT मध्ये पॉवरफुल इंजिन या प्रीमियम स्कूटरमध्ये 350cc, सिंगल-सिलेंडर, लिक्विड-कूल्ड इंजिन मिळू शकते. जे सीव्हीटी ट्रान्समिशनसह येते. हे इंजिन 33.5bhp पॉवर आणि 35Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. यामध्ये राईड-बाय-वायर-थ्रॉटल, ट्रॅक्शन कंट्रोल आणि राइडिंग मोड यासारखी अनेक फीचर्स मिळणार आहे.

मस्क्युलर बॉडी 
याचबरोबर, BMW C 400 GT ला मस्क्युलर बॉडी पॅनेलसह संपूर्ण मॅक्सी-स्कूटर बॉडी किट देण्यात आली आहे. यामध्ये उंच विंडस्क्रीन, पुल-बॅक हँडलबार, एक मोठे स्टेप्ड सीट, ड्युअल फूटरेस्ट, फुल-एलईडी लाइटिंग, कीलेस इग्निशन, हीटेड ग्रिप्स, हीटेड सीट, एबीएस, अँटी-थेफ्ट अलार्म सिस्टम आणि एक ब्लूटूथ-इनेबल्ड इन्स्ट्रुमेंट क्लस्टर यांचा समावेश आहे.

(Hero Pleasure+ XTec : हिरोची नवीन स्कूटर लाँच; ब्लूटूथसह कॉल, SMS अलर्टसह अनेक फीचर्स, जाणून घ्या किंमत...)

Web Title: BMW C 400 GT launched in India, prices start at ₹9.95 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app