शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

१६ ऑक्टोबरला नवीन पल्सर लाँच होणार? पहिल्या सीएनजी बाईकला टक्कर देणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2024 19:31 IST

Bajaj Pulsar N125 : बजाज आपली नवीन पल्सर एक शानदार आणि शहरी बाईक म्हणून लाँच करण्याच्या तयारीत आहे.

Bajaj Pulsar N125 : नवी दिल्ली : बजाज ऑटो आपली नवीन पल्सर भारतीय बाजारपेठेत लाँच करण्याची शक्यता आहे. ही बाईक या फेस्टिव्ह सीझनमध्ये 16 ऑक्टोबर रोजी लाँच केली जाऊ शकते. रिपोर्ट्सनुसार, ही नवीन बाईक बजाज पल्सर एन १२५ (Bajaj Pulsar N125) असू शकते. कंपनीच्या एन सीरिजनं बाजारात यश मिळवलं आहे. तसंच, या सीरिजमधील बाईक्स सर्वात परवडणाऱ्या कॅटगरीतील आहेत.

बजाज आपली नवीन पल्सर एक शानदार आणि शहरी बाईक म्हणून लाँच करण्याच्या तयारीत आहे. ही बाईक कमी कॅपेसिटीची असू शकते. हिंदुस्तान टाइम्सनुसार, हे पल्सर एन१२५ असू शकते. बजाजच्या या नवीन बाईकमध्ये प्रोजेक्टर लेन्स हेडलॅम्पसह एलईडी डीआरएल मिळू शकतात. याशिवाय बाईकमध्ये ट्विन-स्पोक अलॉय व्हील्स देखील दिले जाऊ शकतात.

फीचर्स...बजाज पल्सर एन१२५ ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह पूर्णपणे डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल बसवण्यात आले असल्याची शक्यता आहे. कंपनी या बाईकमध्ये स्प्लिट सीट देऊ शकते. बाईकच्या मागील बाजूस एलईडी दिवे देखील असतील. तसेच, ही नवीन बजाज पल्सर १२५ सीसी, सिंगल सिलिंडर मोटरसह येऊ शकते, जी ५-स्पीड गियर बॉक्सशी जोडलेली असू शकते. सिंगल-चॅनल ABS या बाईकच्या टॉप व्हेरिएंटमध्ये मिळू शकते.

ही बाईक कोणाला टक्कर देणार?भारतीय बाजारात बजाज पल्सर १२५ डिस्कची एक्स-शोरूम किंमत ९२,८८३ रुपयांपासून सुरू होते. ही बाईक एन सीरिजमध्ये आली तर तिचे नवीन मॉडेल कोणत्या रेंजमध्ये बाजारात येईल हे पाहावे लागेल. बजाज पल्सर एन १२५ लॉन्च होताच अनेक बाईकशी टक्कर देऊ शकते. ही बाईक Hero Xtreme 125R, TVS Raider 125 आणि Bajaj Freedom 125 CNG ला टक्कर देऊ शकते.

टॅग्स :bajaj automobileबजाज ऑटोमोबाइलAutomobileवाहनAutomobile Industryवाहन उद्योगbikeबाईक