शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
2
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
3
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
4
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
5
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
7
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
8
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
9
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
10
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
11
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
12
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
13
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
14
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
15
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
16
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
17
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
18
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
19
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
20
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !

Bajaj नं लाँच केली नवी Pulsar NS 125; पाहा किती आहे किंमत आणि काय आहे विशेष

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2021 5:03 PM

Pulsar NS 125 मध्ये काही क्लास लिडिंग फीचर्स देण्यात आले आहेत.

ठळक मुद्देPulsar NS 125 मध्ये काही क्लास लिडिंग फीचर्स देण्यात आले आहेत.बाईकमध्ये देण्यात आले 17 इंचाचे अलॉय व्हिल्स

देशातील आघाडीची दुचाकी वाहन उत्पादक कंपनी बजाज ऑटोने आज बाजारात आपली नवीन Pulsar NS 125 लाँच केली आहे. ही बाईक एन्ट्री लेव्हल  Pulsar 125 च्या तुलनेत अधिक महाग आहे. ही नवी बाईक जुन्या बाईकच्या तुलनेत अधिक पॉवरफुल असली तरी यामध्ये अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम देण्यात आलेलं नाही. कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार नव्या Pulsar NS 125 मध्ये काही क्लास लिडिंग फीचर्स देण्यात आले आहेत. जे या बाईकला सेग्मेंटमध्ये अन्य बाईक्सच्या तुलनेत अधिक उत्तम बनवतात. ही बाईक यापूर्वीच्या पल्सरच्या तुलनेत अधिक वजनदारही आहे. याचं वजन 144 किलो आहे. तरूण वर्गाला ध्यानात ठेवून ही बाईक लाँच करण्यात आली आहे. या बाईकची किंमत 93,690 रूपये एक्स शोरूम दिल्ली इतकी आहे. या बाईकमध्ये कंपनीने 125cc क्षमतेचं सिंगल सिलिंडर असेलेलं एअर कुल्ड फ्युअल इंजेक्टेड DTS-i इंजिनटचा वापर केला आहे. हेच इंजिन या पूर्वीच्या मॉडेलमध्येही देण्यात आलं होतं. परंतु कंपनीनं हे इंजिन निराळ्या प्रकारे ट्यून केलं असून याचं पॉवर आऊटपूटही वाढलं आहे. हे इंजिन 12 PS ची पॉवर आणि 11 Nm चा टॉर्क जेनरेट करतं. हे इंजिन 5 स्पीड गिअरबॉक्सनं युक्त आहे. कोणते आहेत फीचर्स?वैशिष्ट्यांबाबत सांगायचं झालं तर कंपनीने या बाईकमध्ये 17 इंचाचे अलॉय व्हिल्स दिले आहेत. या व्यतिरिक्त, फ्रन्टला 240 mm डिस्क ब्रेक आणि बॅक साईडला 130 mm डिस्क ब्रेक देण्यात आला आहे. ब्रेकिंग सिस्टम अधिक चांगली करण्यासाठी कंपनीनं या बाईकमध्ये कॉम्बी ब्रेकिंग सिस्टमचा वापर केला आहे. तसंच 179 mm चा ग्राउंड क्लियरन्स या दुचाकीला खराब रस्त्यावरुन देखील धावण्यास मदत करतो. कंपनीनं या बाईकच्या डिझाईनमध्ये फार बदल केलेला नाही. ही बाईक चार रंगांमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये ऑरेंज, बर्न्ट रेड, बिच ब्ल्यू आणि ग्रे या रंगांचा समावेश आहे. 

टॅग्स :bajaj automobileबजाज ऑटोमोबाइलbikeबाईकAutomobileवाहन