तारीख ठरली; 5 जुलै रोजी लॉन्च होणार Bajaj ची जगातील पहिली CNG बाईक, किंमत किती..?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2024 17:53 IST2024-07-03T17:52:56+5:302024-07-03T17:53:17+5:30

गेल्या अनेक महिन्यांपासून या CNG बाईकची चर्चा सुरू आहे.

Bajaj CNG Bike : Bajaj's world's first CNG bike to be launched on July 5 | तारीख ठरली; 5 जुलै रोजी लॉन्च होणार Bajaj ची जगातील पहिली CNG बाईक, किंमत किती..?

तारीख ठरली; 5 जुलै रोजी लॉन्च होणार Bajaj ची जगातील पहिली CNG बाईक, किंमत किती..?

Bajaj CNG Bike : गेल्या अनेक महिन्यांपासून ज्या CNG बाईकची चर्चा सुरू होती, त्याची लॉन्चिंग तारीख अखेर समोर आली आहे. येत्या 5 जुलै 2024 रोजी ही बाईक बाजारात दाखल होईल. देशातील आघाडीची बाईक कंपनी Bajaj ने या बाईकची निर्मिती केली असून, या बाईकमध्ये 125 CC इंजिन मिळेल. 

काय विशेष असेल
बजाजच्या नवीन CNG बाईकमध्ये 125 सीसी इंजिन देण्यात येणार आहे. तसेच, या बाईकला अॅडव्हेंचर लूक देण्यात आला आहे. बाईकच्या सीटखाली 5 लिटरची सीएनजी इंधन टाकी मिळेल. 

डिझाइन
या बाईकच्या डिझाईनवर नजर टाकली, तर बजाज सीएनजी बाईकला मस्कुलर टँक कव्हर असेल. यात हँडलबार ब्रेससह गोल हेडलाइट मिळतील. एवढंच नाही, तर यात नकल गार्ड आणि फ्रंट डिस्क ब्रेकदेखील असतील.

किंमत
बजाज ऑटोने अद्याप त्यांच्या किमतींबद्दल कोणतीही माहिती शेअर केलेली नाही. पण असा अंदाज वर्तवला जात आहे की, कंपनी ही बाईक 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या किमतीत मिळेल. कंपनीला या बाईककडून मोठ्या अपेक्षा असल्या तरी पेट्रोलच्या तुलनेत ही CNG बाईक कितपत चांगली कामगिरी करेल हे पाहणे बाकी आहे.
 

Web Title: Bajaj CNG Bike : Bajaj's world's first CNG bike to be launched on July 5