बजाज चेतकला एप्रिल फूल बनविले; टीव्हीएस पहिल्यांदाच नंबर १, विक्रीत ओला कुठे...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2025 13:28 IST2025-05-02T13:27:52+5:302025-05-02T13:28:16+5:30

April Ev Scooter Sale 2025: इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादकांनी एप्रिल २०२५ मध्ये ९१,७९१ युनिट्सची किरकोळ विक्री नोंदवली आहे.

April Ev Scooter Sale 2025: Bajaj Chetak on third; TVS becomes number 1 for the first time, Ola is behind in sales... | बजाज चेतकला एप्रिल फूल बनविले; टीव्हीएस पहिल्यांदाच नंबर १, विक्रीत ओला कुठे...

बजाज चेतकला एप्रिल फूल बनविले; टीव्हीएस पहिल्यांदाच नंबर १, विक्रीत ओला कुठे...

ईलेक्ट्रीक वाहनांच्या विक्रीत निम्म्याने घट झाली आहे. मार्चमध्ये १.३० लाख ईलेक्ट्रीक टुव्हीलरची विक्री झाली होती. परंतू, एप्रिलमध्ये 65,555 एवढ्याच स्कूटरची विक्री झाली आहे. वाहन पोर्टलवर उपलब्ध असलेल्या नवीनतम किरकोळ विक्री डेटानुसार (सकाळी ७ वाजता - १ मे २०२५) हा आकडा देण्यात आला आहे. मार्चमध्ये चेतकने 34,907 स्कूटर विकल्या होत्या, एप्रिलमध्ये हा आकडा १३००० वरच अडकला आहे. त्याहून धक्कादायक म्हणजे चेतक तिसऱ्या क्रमांकावर गेली आहे. तर टीव्हीएसने पहिल्यांदाच पहिला क्रमांक पटकावला आहे. 

इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादकांनी एप्रिल २०२५ मध्ये ९१,७९१ युनिट्सची किरकोळ विक्री नोंदवली आहे. टीव्हीएसने १९,७३६ युनिट्स विकले आहेत. ओला इलेक्ट्रिकने दुसरा क्रमांक पटकावला आहे, १९,७०९ युनिट्स विकल्या आहेत. ओलाचा पहिला क्रमांक केवळ २७ युनिटनी गेला आहे. या तुलनेत चेतकची विक्री जास्त पडलेली नाही, परंतू ३५ युनिटनी पहिला क्रमांक हुकला आहे. 

एथरने आपली विक्रीची सरासरी कायम ठेवली आहे. एथरने १३,१६७ युनिट्स विकले आहेत. मार्चमध्ये एथरने १५४६७ स्कूटर विकल्या होत्या. सर्वात मोठा फटका हा टीव्हीएस, ओला आणि चेतकला बसला आहे. मार्चमध्ये टीव्हीएसने ३०४७७ स्कूटर विकून दुसरा क्रमांक पटकावला होता. तर ओलाने २३४३५ स्कूटर विकल्या होत्या. 

इतर कंपन्या कुठे?

बऱ्याच काळापासून वरील चारच कंपन्या पहिल्या चारमध्ये आहेत. यामुळे हिरो विडा, ग्रीव्हज, प्युअर, बीगॉस, कायनेटीक ग्रीन, रिव्हर या कंपन्या कुठे आहेत, असा सवाल अनेकांच्या मनात येत आहे. तुमच्या माहितीसाठी पहिल्या १० मध्ये तर रिव्होल्ट, ओबेन सारख्या कंपन्या तर खिजगणतीतही नाहीत. कारण १० व्या नंबरवर जी कंपनी आहे तिचा सेल ७८५ एवढा आहे. ती देखील रिव्हर मोबिलिटी ही कंपनी आहे. हिरो विडा ६१२३, ग्रीव्हज ४०००, प्युअर १४४९, बीगॉस १३११, कायनेटीक १३०६ अशा पहिल्या १० तील कंपन्यांच्या विक्रीचा आकडा आहे. 

एकतर ईलेक्ट्रीक स्कूटर घेणे म्हणजे डोकेदुखी आहे. ओला, चेतकची तर सर्व्हिसची बोंबाबोंब आहे. चेतकला तर पुण्यातही नीट सर्व्हिस दिली जात नाही, परंतू बजाजच्या नावामुळे लोक डोळे झाकून घेत आहेत. टीव्हीएसची स्कूटर व्हील मोटर असली तरी देखील लोक घेत आहेत. ओलाची स्कूटरची सर्व्हिसची बोंब असूनही मागणी आहे. एथरची देखील सर्व्हिस सेंटर कमी आहेत, परंतू त्यांची सर्व्हिस या पहिल्या चारमध्ये सर्वात चांगली आहे. चेतकची स्कूटर एकदा का दुरुस्तीला दिली की पुढचे १५-२० दिवस ती विसरूनच जायची, अशी परिस्थिती आहे. ओलाने आपली महिन्या महिन्याची धूळ खात पडणारी सर्व्हिस सुधारल्याचा दावा केला आहे. यामुळे लोकांच्या ईव्ही घेतल्यानंतर डोक्याला ताप होत आहे.   

Web Title: April Ev Scooter Sale 2025: Bajaj Chetak on third; TVS becomes number 1 for the first time, Ola is behind in sales...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.