शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
4
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
5
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
6
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
7
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
8
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
9
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
10
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
11
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
12
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
13
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
14
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
15
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
16
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
17
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
18
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
19
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
20
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
Daily Top 2Weekly Top 5

इलेक्ट्रीक वाहनांच्या उत्पादनासाठी TVS Motors आणि BMW Motorrad मध्ये करार; पाहा डिटेल्स...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2021 16:31 IST

TVS Motor आणि BMW Motorrad सोबत मिळून नवीन तंत्रज्ञान विकसित करतील आणि याद्वारे आपले प्रोडक्ट बनवतील.

ऑटोमोबाईल क्षेत्रातील मोठी कंपनी टीव्हीएस मोटरने बुधवारी देशात इलेक्ट्रिक वाहन(ईवी) आणि भविष्यातील तंत्रज्ञानाला वाढवण्यासाठी बीएमडब्ल्यू मोटरराड इंडियासोबत लॉन्ग-टर्म कॉर्पोरेटिव्ह पार्टनरशिपची घोषणा केली आहे. या दोन्ही कंपन्यांच्या संयुक्त विद्यमाने तयार होणारे प्रोडक्ट पुढील दोन वर्षाज जगासमोर येईल.

दोन्ही कंपन्या संयुक्तपणे नवीन प्लॅटफॉर्म विकसित करतील आणि या सोप्या प्लॅटफॉर्मवर त्यांची खास उत्पादने बनवतील. ही उत्पादने जागतिक स्तरावर विकली जातील. भागीदारी अंतर्गत, TVS BMW Motorrad उत्पादनांच्या डिझाइन आणि विकासासाठी तसेच पुरवठा साखळी व्यवस्थापन आणि औद्योगिकीकरणावर देखरेख करण्यासाठी जबाबदार असेल. चेन्नईस्थित कंपनी डिझाईन आणि मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आपले अभियांत्रिकी कौशल्य वाढवणे तसेच उत्पादनांना सर्वोत्तम दर्जा प्रदान करणे सुरू ठेवेल.

इलेक्ट्रिक वाहनांवर कंपन्या का भर देत आहेत?

ही भागीदारी अशा वेळी आला आहे, जेव्हा ओला इलेक्ट्रिक आणि एथर सारख्या नवीन युगातील स्टार्ट-अप इलेक्ट्रिक स्कूटर्समध्ये त्यांची गुंतवणूक वाढवत आहेत. टीव्हीएस आणि बजाज ऑटो सारख्या जुन्या दुचाकी उत्पादकांना देखील त्याचे अनुसरण करण्यास भाग पाडत आहे. महिंद्रा अँड महिंद्रा आणि टाटा मोटर्स सारख्या शीर्ष वाहन निर्मात्या देखील EV मध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत. 

येत्या दोन वर्षात उत्पादन येणारसध्या उच्च बॅटरी खर्च आणि चार्जिंग सुविधांचा अभाव यामुळे, देशातील एकूण दुचाकी विक्रीमध्ये इलेक्ट्रिक वाहनांचा वाटा तुलनेने कमी आहे. TVS आणि BMW Motorrad यांनी 2013 मध्ये मोटारसायकली तयार करण्यासाठी दीर्घकालीन करारावर स्वाक्षरी केली आणि आता जागतिक स्तरावर विकल्या जाणार्‍या दोन कंपन्यांसाठी विशेष उत्पादने विकसित करण्यासाठी कराराचा विस्तार करत आहेत. TVS ने सांगितले की या भागीदारीचे पहिले उत्पादन पुढील 24 महिन्यांत दाखवले जाईल. 

टॅग्स :electric vehicleवीजेवर चालणारं वाहनBmwबीएमडब्ल्यूAutomobile Industryवाहन उद्योग