Hyundai Tucson Launch: ह्युंदाईची नवी SUV लॉन्च, धडकण्यापूर्वी देईल वॉर्निंग, जाणून घ्या किंमत
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2022 15:38 IST2022-08-10T15:37:43+5:302022-08-10T15:38:26+5:30
ही SUV प्लॅटिनम आणि सिग्नेचर अशा दोन ट्रिममध्ये लॉन्च करण्यात आली आहे. बाजारात या नव्या ट्युसॉनची स्पर्धा जीप कंपास, सिट्रोएन सी-5 एअरक्रॉस आणि फोक्सवॅगन टिगुआनसारख्या गाड्यांसोबत असेल.

Hyundai Tucson Launch: ह्युंदाईची नवी SUV लॉन्च, धडकण्यापूर्वी देईल वॉर्निंग, जाणून घ्या किंमत
ह्युंदाईने (Hyundai) भारतात आपली प्रीमियम SUV Hyundai Tucson लॉन्च केली आहे. हिची भारतातील एक्स-शोरूम किंमत 27.7 लाख रुपयांपासून सुरू होते. मात्र, अद्याप हिच्या इतर व्हेरिअंटच्या किंमतीसंदर्भात कसल्याही प्रकारची माहिती देण्यात आलेली नाही. हे या एसयूव्हीच्या चौथ्या जेनरेशनचे मॉडेल आहे.
ही SUV प्लॅटिनम आणि सिग्नेचर अशा दोन ट्रिममध्ये लॉन्च करण्यात आली आहे. बाजारात या नव्या ट्युसॉनची स्पर्धा जीप कंपास, सिट्रोएन सी-5 एअरक्रॉस आणि फोक्सवॅगन टिगुआनसारख्या गाड्यांसोबत असेल. महत्वाचे म्हणजे ही एसयूव्ही ADAS लेव्हल 2 फीचर्ससह लॉन्च करण्यात आली आहे. यामुळे ही कार धडक असण्याची शक्यता असल्यास आपल्याला वॉर्निंग देखील देईल.
Hyundai Tucson इंजिन -
न्या Hyundai Tucson ला 2.0-लिटर पेट्रोल आणि डिझेल इंजिन देण्यात आले आहे. 2.0 लिटरचे चार सिलिंडर इंजिन 156hp ची पॉवर आणि 192Nm एवढा टार्क जेनरेट करते. हे इंजिनला 6-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससोबत जोडण्यात आले आहे. तर दुसरे 2.0-लिटरचे डिझेल इंजिन 186hp आणि 416Nm एवढा टार्क जनरेट करते. ते 8-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सने जोडले जाते.
लेव्हल-2 ADAS फीचर्स -
ADAS फीचर्स असलेली ही भारतातील पहिली Hyundai कार आहे. ADAS लेव्हल 2 मध्ये आपल्याला फॉरवर्ड कोलिजन वॉर्निंग, ब्लाइंड स्पॉट असिस्ट, लेन किप असिस्ट, रिअर क्रॉस ट्रॅफिक अलर्ट सारखे फीचर्स मिळतील. इतर सेफ्टी फीचर्समध्ये सहा एअरबॅग्स, फ्रंट आणि रिअर पार्किंग सेंसर, ईएससी, हिल-डिसेंट कंट्रोल आणि ऑल-व्हील डिस्क ब्रेकही देण्यात आले आहेत.