Renault ची सर्वात स्वस्त कार Kwid नव्या रूपात लाँच; मिळतात हे खास फीचर्स

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2021 08:42 PM2021-09-02T20:42:52+5:302021-09-02T20:43:22+5:30

Renault Kwid : कंपनीनं केली kwid नव्या रूपात लाँच. नव्या कारमध्ये करण्यात आले अनेक बदल. 

2021 renault kwid launched price at rs 4 06 lakh here is features and specification details | Renault ची सर्वात स्वस्त कार Kwid नव्या रूपात लाँच; मिळतात हे खास फीचर्स

Renault ची सर्वात स्वस्त कार Kwid नव्या रूपात लाँच; मिळतात हे खास फीचर्स

googlenewsNext
ठळक मुद्देकंपनीनं केली kwid नव्या रूपात लाँच. नव्या कारमध्ये करण्यात आले अनेक बदल. 

फ्रेंच प्रमुख वाहन निर्माता Renault नं आपल्या स्वस्त कार Kwid चे नवीन फेसलिफ्ट मॉडेल भारतीय बाजारात लाँच केले आहे. कंपनीने नवीन क्विडमध्ये बरेच बदल केले आहेत जे या कारला पूर्वीच्या कारच्या तुलनेत अधिक उत्तम बनवतात. आकर्षक स्पोर्टी लुक आणि मजबूत इंजिन असलेल्या या कारची सुरुवातीची किंमत 4.06 लाख रुपयांपासून ते 5.51 लाख रुपयांपर्यंत आहे.

नव्या Renault Kwid मध्ये सुरक्षेच्या दृष्टीने काही नवे फीचर्स देण्यात आले आहेत. जरी डिझाइन, आकार आणि इंजिन यंत्रणा इत्यादी सारखीच आहेत, तरी कारमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत.  कंपनीने भारतात आपली 10 वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर क्विडचं अपडेटेड मॉडेल लाँच केलं आहे. नवीन क्विडची किंमत जास्त असली तरी त्यात काही खास फीचर्सही देण्यात आले आहेत.

काय आहेत फीचर्स?
या कारचे सर्व व्हेरिअंट्स ड्युअल फ्रंट एअरबॅगसह येतात, याशिवाय ड्रायव्हर साइड पायरोटेक प्रीटेन्शनर देखील त्यात देण्यात आले आहे. अन्य स्टॅडर्ड सेफ्टी फिचर्सम्हणू यामध्ये रिअर सेन्सर, स्पीड अलर्ट सिस्टम, इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रिब्युशन, एबीएस आणि सीट बेल्ट रिमाईंडरसारखे फीचर्स देण्यात आले आहेत.

ड्युअल टोन कलर स्कीम
नवी रेनो ही कार ड्युअल डोन कलर स्कीम व्हाईट सोबत ब्लॅक रुफमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये इलेक्ट्रीक आऊट साईड रिअल व्ह्यू मिरर (ORVM) सोबत रात्री ड्राईव्हसाठी IRVM देण्यात आलं आहे. स्मार्टफोन कनेक्टिव्हीटीसह यामध्ये 8 इंचाचा टचस्क्रिन इन्फोटेन्मेंट सिस्टम, रिअर सीट आर्मरेस्ट आणि रिअर पार्किंग कॅमेरा सारखे फीचर्स या कारला आणखी चांगलं बनवतात.

इंजिनमध्ये बदल नाही
या कारच्या इंजिनमध्ये कोणत्याही प्रकारे बदल करण्यात आलेला नाही. ही कार 0.8 लीटर आणि 1.0 लीटर इंजिन पर्यायांसह येते. याचं 0.8 लीटर पेट्रोल इंजिन 54bhp ची पॉवर आणि 72Nm ता टॉर्क जनरेच करतं. हे इंजिन केवळ 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन गिअरबॉक्ससह येतं. तर 1.0 लीटर इंजिन 68bhp ची पॉवर आणि 91Nm चा टॉर्क जनरेट करतं. हे इंजिन 5 स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह येतं.

किती आहे किंमत?
 

Renault Kwid RXE 0.8L –  Rs 4,06,500 

Renault Kwid RXL 0.8L – Rs 4,36,500 

Renault Kwid RXT 0.8L – Rs 4,66,500 

Renault Kwid RXL 1.0L MT – Rs 4,53,600 

Renault Kwid RXL 1.0L EASY-R –  Rs 4,93,600 

Renault Kwid RXT 1.0L MT option –  Rs 4,90,300 

Renault Kwid CLIMBER 1.0L MT option –  Rs 5,11,500 

Renault Kwid RXT 1.0L EASY- R option – Rs 5,30,300 

Renault Kwid CLIMBER 1.0L EASY-R option –  Rs 5,51,500

Web Title: 2021 renault kwid launched price at rs 4 06 lakh here is features and specification details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.