एका महिन्यात १० हजार बुकिंग्स; लाँचपूर्वीच Volkswagen च्या SUV नं केली कमाल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2021 07:23 PM2021-09-18T19:23:09+5:302021-09-18T19:28:29+5:30

Volkswagen पुढील आठवड्यात SUV लाँच करणार आहे. ग्राहकांकडून या कारला लाँच पूर्वीच उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे. 

10,000 bookings a month; Volkswagen's SUV Kelly Max before launch | एका महिन्यात १० हजार बुकिंग्स; लाँचपूर्वीच Volkswagen च्या SUV नं केली कमाल

एका महिन्यात १० हजार बुकिंग्स; लाँचपूर्वीच Volkswagen च्या SUV नं केली कमाल

Next
ठळक मुद्देVolkswagen पुढील आठवड्यात SUV लाँच करणार आहे. ग्राहकांकडून या कारला लाँच पूर्वीच उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे. 

जर्मनीची कार उत्पादक कंपनी फोक्सवॅगन (Volkswagen) आपली कॉम्पॅक्ट एसयूव्ही Volkswagen Taigun 23 सप्टेंबर रोजी भारतीय बाजारात लाँच करणार आहे. ही एसयुव्ही लाँच होण्यापूर्वीच या कारला ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. कंपनीने 18 ऑगस्टपासून या कॉम्पॅक्ट एसयूव्हीचं बुकिंग सुरू केलं होतं. परंतु आता carandbike च्या अहवालानुसार, Volkswagen Taigun चा 10 हजारांपेक्षाही प्री-ऑर्डर्स मिळाल्या आहेत.

Volkswagen ब्रांडचे बोर्ड मेंबर फॉर सेल्स, मार्केटिंग आणि आफ्टर सेल्स Klaus Zellmer यांनी याबाबत खुलासा केला. "भारतात दर महिन्याला Volkswagen Taigun च्या 5 ते 6 हजार युनिट्सची विक्री करण्याचं आमचं लक्ष्य आहे. परंतु आम्हाला लाँचपूर्वीच 10 हजार प्री बुकिंग्स मिळाल्या आहेत. Taigun ही Volkswagen समुहाचं पहिलं मॉडेल आहे जे India 2.0 स्ट्रॅटेजी अंतर्गत MQB-A0-IN प्लॅटफॉर्मवर विकसित करण्यात आलं आहे," अशी माहिती त्यांनी एका विशेष संभाषणादरम्यान दिली.

काय आहेत फीचर्स?
एसयूव्हीच्या टॉप-स्पेक जीटी व्हेरिअंटमध्ये एलईडी हेडलाइट्स, एलईडी डे टाईम रनिंग लाईट्स, 17-इंच ड्युअल-टोन अलॉय व्हिल्स देण्यात आले आहेत. कारच्या इंटीरियरमध्ये 10-इंच टचस्क्रीन डिस्प्ले आणि पूर्णपणे डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर सारखी वैशिष्ट्ये असतील. सर्व प्रवाशांच्या सुरक्षेसाठी एसयूव्ही 3-पॉइंट सीटबेल्ट, ISOFIX माउंट, रिअर पार्किंग कॅमेरा, ABS आणि सर्व प्रवाशांसाठी 6 एअरबॅग्सही देण्यात आल्या आहेत. ही कार Hyundai Creta आणि Kia Seltos सारख्या वाहनांशी स्पर्धा करेल.

ही कार दोन प्रकारच्या इंजिन ऑप्शनसह येणार आहे. यामध्ये 1.0 लीटर TSI आणि 1.5 लीटर TSI पेट्रोल इंजिन पाहायला मिळेल. 1.0 लीटर टर्बोचार्ज्ड इंजन का आउटपुट 113 PS आणि 175 Nm इतकं आहे. हे इंजिन  6-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड ऑटोमॅटिक ट्रांसमिशनसोबत येतं. 1.5 लीटर TSI पेट्रोल 148 bhp ची पॉवर आणि 250 Nm का टॉर्क जेनरेट करतं. या इंजिनसोबत  6-स्पीड मॅन्युअल आणि 7-स्पीड डीएसजी ट्रांन्समिशनचा ऑप्शन मिळतो. 

Web Title: 10,000 bookings a month; Volkswagen's SUV Kelly Max before launch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app