मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा आमदार खासदारांच्या बैठकीत आमदारांच्या चार वषार्तील कामगिरीचे रिपोर्ट कार्ड त्यांच्या हातात दिले आणि चार वर्षे आराम केला असेल तर आता उरलेल्या वर्षात जोमाने कामाला लागा अशा कानपिचक्याही दिल्या. ...
सामाजिक न्याय विभागातील ३४ सहाय्यक आयुक्तांना उपायुक्तपदी नियमबाह्य पदोन्नती दिल्याचे प्रकरण समोर आले आहे. कोणतेही नियम नसताना थेट पदोन्नतीने १०० टक्के पदे भरण्यात आली. सामान्य प्रशासन विभागाने या पदोन्नतीवर तीव्र हरकत घेतली होती. ...
काटोलमध्ये आशिष यांच्या रुपाने पहिल्यांदाच कमळ फुलले, ते २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत. माजी मंत्री आणि काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष रणजित देशमुख यांचे आशिष हे चिरंजीव. ...
प्रकाश आंबेडकर यांचा अकोला, वाशिम आणि बुलडाणा या तीन जिल्ह्यांमध्ये चांगला प्रभाव आहे. एमआयएमची मुख्य भिस्त मुस्लिम मतदारांवर आहे. २०१४ मध्ये दोन आमदार निवडून आणून पक्षाने महाराष्ट्र विधानसभेत प्रवेश मिळविला. ...
सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्या मंत्रालयातील कार्यालयातील एका अधिकाऱ्याने पैसे घेऊन काम केले नाही म्हणून जाब विचारण्यासाठी गेलेल्या एकाने त्या अधिका-याची सर्वांसमक्ष धुलाई केली. ...
समांतर आरक्षणांतर्गतची खुली पदे ही खुल्या प्रवर्गातूनच भरण्याची भूमिका राज्य सरकारने कायम ठेवली आहे. समांतर आरक्षणांतर्गतची पदे भरण्याची कार्यवाही काटेकोरपणे करावी, असे आदेश सामान्य प्रशासन विभागाने गुरुवारी काढले. ...