कोरोनाबाधितांची संख्या जसजशी वाढत आहे तसतशी साधनसामग्रीची टंचाई जाणवू लागली आहे. यात वास्तविकताही आहे, नाही असे नाही; परंतु काही बाबतीत कृत्रिम टंचाई निर्माण करून संधिसाधूपणा केला जात असेल तर ते अश्लाघ्य, अवाजवी व अनैतिकही ठरेल. ...
Nashik Oxygen Leak: नाशकात घडलेली दुर्घटना मन सुन्न करणारी आहे. जो वायु प्राण वाचवण्यासाठी उपयोगी पडतो त्याच प्राणवायूच्या गतीमुळे रुग्णांना प्राण गमावण्याची वेळ यावी हेच शोकात्म आहे, सारा महाराष्ट्र या घटनेमुळे तळमळणे स्वाभाविक ठरले आहे. ...
राजकारण्यांना नेहमी टीकेला सामोरे जावे लागत असते. आता कोरोनाकाळातही ते दिसत नसल्याची टीका होत आहे; पण यातही संवेदनशीलता जपून कामाला लागलेल्यांचा अपवाद पुढे येऊ लागल्याने काहीसा दिलासा मिळून गेला आहे. ...
राज्यातील कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा वेग एकीकडे वाढत असताना व देशात महाराष्ट्र याबाबतीत अव्वल असताना दुसरीकडे पंधरा दिवसांची संचारबंदी जाहीर करतेवेळी तळातल्या घटकांसाठी विविध तरतुदीही ठाकरे सरकारने केल्या आहेत. ...
आपत्तीलाही इष्टापत्ती मानून संधिसाधूपणा करणारे कमी नसतात, त्यास राजकारण व प्रशासनातील तशा मानसिकतेचे लोकही कसे अपवाद ठरावेत? या दोन्ही क्षेत्रातील मोठा वर्ग अतिशय निकराने कोरोनाशी लढाई लढत असताना काही मूठभर मात्र या संकटाचेही राजकारण करताना दिसतात ते ...
सद्य:स्थितीत आपली काळजी आपल्यालाच घ्यावी लागणार आहे, म्हणूनच राज्यातील ठाकरे सरकारने ‘मी जबाबदार’ मोहीम सुरू केली आहे. कोरोनाची साखळी खंडित करायची असेल तर सर्वांना जबाबदारीने वागावे लागेल. ...
कोरोनाच्या उच्चाटनासाठी आरोग्य यंत्रणा राब राब राबत आहे. रात्रंदिवस जीव धोक्यात घालून त्यांची प्रयत्नांची शर्थ सुरू आहे; पण दुसरीकडे काही घटक मात्र अजूनही बेफिकिरीने वागताना दिसून येतात, ज्याचा फटका सामान्यांना बसणे स्वाभाविक ठरून जाते. ...