Woman dies during treatment after husband burns her | छुल्लक वादातून पतीने डीझेल टाकून पेटवलेल्या पत्नीचा उपचारादरम्यान मृत्यू 

छुल्लक वादातून पतीने डीझेल टाकून पेटवलेल्या पत्नीचा उपचारादरम्यान मृत्यू 

सोयगाव : विवाहितेच्या अंगावर डीझेल ओतून तिला जिवंत जाळल्याची घटना नांदगाव(ता.सोयगाव) येथे ३० मे रोजी घडली. यावेळी जळीत विवाहितेला जळगावच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, तिचा उपचारादरम्यान शनिवारी दुपारी मृत्यू झाला. छायाबाई रोहिदास पवार असे मृत महिलेचे नाव आहे. या घटनेमुळे सोयगाव तालुक्यात खळबळ उडाली असून पतीविरुद्ध सोयगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदगाव ता.सोयगाव येथे (दि.३०मे)पहाटे पाच वाजता रोहिदास पवार याने पत्नी छायाबाई (वय ३५) यांना छुल्लक वादातून अंगावर डीझेल टाकून पेटविले होते. या घटनेत छायाबाई ८० टक्के भाजली असता तिला तातडीने जळगावच्या खासगी रुग्णालयात पचारासाठी दाखल करण्यात आले होते. तिचा उपचारादरम्यान शनिवारी दुपारी मृत्यू झाला. याप्रकरणी मृताची मुलगी दिपाली पवार (१६) हिने शनिवारी सोयगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून रोहिदास गोविंदा पवार(वय ४०)याचेविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी औरंगाबाद ग्रामीणच्या पोलीस अधीक्षका मोक्षदा पाटील,अप्पर पोलीस अधीक्षक गणेश गावडे,उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाठ, जमादार संतोष पाईकराव, सागर गायकवाड, दिलीप तडवी, संदीप चव्हाण, अविनाश बनसोडे, कविता मिस्तरी, वैशाली सोनवणे तपास करत आहेत. 

Web Title: Woman dies during treatment after husband burns her

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.