Unnatural rape of 12-year-old girl by abduction; The accused faces up to 7 years in prison | अपहरणकरून १२ वर्षीय मुलीवर अनैसर्गिक बलात्कार; आरोपीस ७ वर्षाचा कारावास
अपहरणकरून १२ वर्षीय मुलीवर अनैसर्गिक बलात्कार; आरोपीस ७ वर्षाचा कारावास

सिल्लोड : घरात घुसून एका १२ वर्षीय मुलीचे अपहरणकरून तिच्यावर अनैसर्गिक बलात्कार करणाऱ्या आरोपीस औरंगाबाद येथील  विशेष जिल्हा सत्र न्यायालयाने ७ वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. आयुब मोहंमद पटेल (३८, रा.अंधारी ) असे आरोपीचे नाव आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, १६ नोव्हेंबर २०१५ रोजी तालुक्यातील अंधारी येथे एक १२ वर्षीय मुलगी संध्याकाळी तिच्या घरात जेवण करत होती. यावेळी घरी कोणी नसल्याचा फायदा घेत गावातीलच आयुब मोहंमद पटेल याने घरात घुसून मुलीचे अपहरण केले. आयुबने तिला स्वतःच्या घरी नेत तिच्यावर अनैसर्गिक पद्धतीने बलात्कार केला. घटना उघडकीस आल्यानंतर आरोपी विरुद्ध सबळ असा पुरावा उपलब्ध करुन तपास अधिकारी यांनी आरोपी विरुध्द विशेष सत्र व जिल्हा न्यायालय येथे दोषारोप पत्र सादर केले होते. सबळ पुरावे आणि साक्षी गृहीत धरता न्यायालयाने आरोपीस आरोपीस ७ वर्षाचा सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. 

या खटल्यात शासकीय अभियोक्ता म्हणून अरविंद बागुल यांनी काम पाहिले तर तपास अधिकारी म्हणून मिलिंद खोपडे, व्ही.एस.सोनवणे, पैरवी अधिकारी म्हणून व्ही.एस.यमपुरे, आर.सी.आगे, एस.बी.वाघ यांनी काम पाहिले असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांनी दिली.

Web Title: Unnatural rape of 12-year-old girl by abduction; The accused faces up to 7 years in prison

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.