The type of malpractice in statewide exams ? The health department will investigate the whole matter | राज्यभरात परीक्षेत गैरव्यवहार ? आरोग्य विभाग करणार संपूर्ण प्रकरणाची चौकशी

राज्यभरात परीक्षेत गैरव्यवहार ? आरोग्य विभाग करणार संपूर्ण प्रकरणाची चौकशी

ठळक मुद्देही परीक्षा आऊटसोर्सिंगद्वारे एका कंपनीच्या माध्यमातून घेण्यात आलीगैरव्यवहाराची माहिती मिळताच आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली.

औरंगाबाद : खोकडपुऱ्यात एका अभ्यासिकेत आरोग्य विभागाच्या परीक्षेत उत्तरे पुरविण्याचे रॅकेट चिकलठाणा पोलिसांनी रविवारी उद्ध्वस्त केले. या प्रकाराची पोलिसांकडून चौकशी केली जाईल. गुन्हाही दाखल होईल. त्यासोबत आमच्याकडूनही चौकशी केली जाईल, असे आरोग्य उपसंचालक डाॅ. स्वप्निल लाळे यांनी सांगितले.

सार्वजनिक आरोग्य विभागामधील रिक्त पदे भरण्यासाठी रविवारी राज्यभरात परीक्षा घेण्यात आली. औरंगाबादेत ३५ केंद्रांवर सकाळी १० ते १२ आणि दुपारी ३ ते ५ या दोन सत्रांत ही परीक्षा घेण्यात आली. सकाळच्या सत्रातील परीक्षा सुरू असतानाच पोलिसांनी खोकडपुऱ्यात अभ्यासिकेेवर धाड टाकली आणि परीक्षार्थींना उत्तरे देण्याच्या प्रकाराचा पर्दाफाश केला. या प्रकाराची माहिती मिळताच आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली. ही परीक्षा आऊटसोर्सिंगद्वारे एका कंपनीच्या माध्यमातून घेण्यात आली आहे. पोलिसांकडून तर कारवाई होईलच, आरोग्य विभागाकडूनही चौकशी केली जाणार असल्याचे डाॅ. स्वप्निल लाळे यांनी सांगितले.

‘त्या’ परीक्षार्थींचे काय होणार?
या रॅकेटमधील लाेकांनी ज्या परीक्षार्थींना उत्तरे सांगितली, त्या सर्वांची नावे पोलीस तपासातून बाहेर येतील. त्या परीक्षार्थींसंदर्भात आरोग्य विभाग काय निर्णय घेणार, यासंदर्भात मात्र काही सांगण्यात आले नाही.

राज्यभरात हा प्रकार?
औरंगाबादेत ज्याप्रमाणे उत्तरे पुरविण्याचा प्रकार झाला, तसाच प्रकार राज्यभरात अन्य ठिकाणीही झाल्याची शक्यता नाकारता येत नाही.

Web Title: The type of malpractice in statewide exams ? The health department will investigate the whole matter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.