Two youths drown in a lake in Kannada | कन्नडमध्ये दोन युवकांचा तलावात बुडून मृत्यू
कन्नडमध्ये दोन युवकांचा तलावात बुडून मृत्यू

बनशेंद्रा (औरंगाबाद ) : कन्नड तालुक्यातील बनशेंद्रा येथील दोन युवकांचा गावा जवळील एका तलावात बुडून मृत्यु झाल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. अक्षय महेंद्र त्रिभुवन (16) व नितिन सुभाष वाहुळ(18)  असे दोघा मृतांची नावे आहेत. दोघेही शुक्रवारी दुपारी पोहण्यासाठी तलावात गेले होते.

याबाबत अधिक माहिती अशी की, अक्षय आणि नितीन हे शुक्रवारी दुपारी दुपारी 2:30 वाजेच्या दरम्यान घरातून शेतात जात आहोत असे सांगून निघाले. मात्र शेतात न जाता दोघेही गावाजवळील तलावाकडे गेली. येथे पोहत असताना दोघेही बुडाली. रात्री उशिरा पर्यंत दोघेही घरी परतली नाही यामुळे नातेवाईकांनी त्यांचा शोध सुरु केला.मात्र ते आढळून आली नाहीत. त्यानंतर तलावाजवळ दोघांची कपडे सापडली. आज सकाळी तलावात दोघांचेही मृतदेह तलावात तरंगताना आढळून आली. अक्षय हा शिवाजी महाविदयालयात अकरावी वर्गात एम.सी.व्ही.सीचे शिक्षण घेत होता, विशेष म्हणजे आज त्याचा जन्मदिवस होता. तर नितीन हा एका हॉटेलमध्ये कामाला होता. 


Web Title: Two youths drown in a lake in Kannada
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.