Three years of hard labor for raping a married woman | विवाहितेवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या तिघांना २० वर्षे सक्तमजुरी

विवाहितेवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या तिघांना २० वर्षे सक्तमजुरी

लोकमत न्यूज नेटवर्क 
औरंगाबाद : मुकुंदवाडी परिसरात ऑक्टोबर २०१७ रोजी २२ वर्षीय विवाहितेवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या तीन आरोपींना २० वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा विशेष न्यायालयाचे न्यायाधीश संजय कुलकर्णी यांनी एससी आणि एसटी (पीओए) कायद्याअंतर्गत ठोठावली आहे. सागर सुभाष बुट्टे (२०), अनिल अंबादास डुकले (२६) उमेश उत्तम डुकले (२२) अशी आरोपींची नावे आहेत.

जयभवानीनगर चौकात विवाहित महिला ५ ऑक्टोबर २०१७ रोजी रात्रीउभी होती. त्यावेळी तिन्ही आरोपिंनी त्या महिलेला रेल्वेस्टेशन येथे सोडविण्यासाठी रिक्षात बसविले. त्यानंतर आरोपींनी रिक्षात गॅस भरावयाचा आहे, असे सांगून मुकुंदवाडी येथील रामकाठी येथे नेले. तिथे एका खोलीत नेऊन सामूहिक बलात्कार केला होता. 
 

Web Title: Three years of hard labor for raping a married woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.