गौताळा अभयारण्यात वन्यजीवरक्षकांच्या निवासस्थानांवर दगडफेक; गस्ती वाहन जाळले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2020 08:32 AM2020-10-26T08:32:13+5:302020-10-26T09:28:31+5:30

सोमवारी पहाटे निवासस्थानावर अचानक दगडफेक करण्यात आली .

Stone-throwing at wildlife rangers in Gautala Sanctuary; Patrol vehicle set on fire! | गौताळा अभयारण्यात वन्यजीवरक्षकांच्या निवासस्थानांवर दगडफेक; गस्ती वाहन जाळले !

गौताळा अभयारण्यात वन्यजीवरक्षकांच्या निवासस्थानांवर दगडफेक; गस्ती वाहन जाळले !

googlenewsNext

कन्नड - गौताळा अभयारण्याच्या वन्यजीव रक्षकाच्या हिवरखेडा गौताळा येथील निवासस्थानावर अज्ञाताने पहाटे तीन वाजेदरम्यान दगडफेक करुन गस्तीवाहनाला आग लावल्याची धक्कादायक घटना घडली.

अभयारण्याच्या हिवरखेडा गौताळा येथील निवासस्थानात कन्नड विभागाचे वन्यजीवरक्षक राहुल शेळके आणि नागद वनपरिक्षेत्र अधिकारी सागर ढोले हे राहतात.सोमवारी पहाटे त्यांच्या निवासस्थानावर अचानक दगडफेक सुरु झाल्याने दोन्हीही अधिकारी धास्तावले.त्यांनी शहर पोलीस ठाणे,तहसिलदार यांना भ्रमणध्वनीवर घटनेची माहिती दिली.

दगडफेकीमुळे दोघेही अधिकारी निवासस्थानाबाहेर आले नाहीत. या दरम्यान निवासस्थानाबाहेर उभ्या असलेल्या गस्ती वाहनाला आग लावून आरोपी फरार झाले.सकाळी वन्यजीव रक्षक राहुल शेळके यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

Web Title: Stone-throwing at wildlife rangers in Gautala Sanctuary; Patrol vehicle set on fire!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.