speedy tanker hits mopeds in an attempt to move forward; The woman was killed on the spot | पुढे जाण्याच्या प्रयत्नात भरधाव टँकरची मोपेडला धडक; महिला जागीच ठार

पुढे जाण्याच्या प्रयत्नात भरधाव टँकरची मोपेडला धडक; महिला जागीच ठार

ठळक मुद्देमहिलेच्या डोक्यावरून चाक गेल्याने जागीच मृत्यू

वैजापूर : रोटेगाव रस्त्यावर ओव्हरटेकच्या प्रयत्नात भरधाव टँकरने मोपेडला जोरदार धडक दिला. यात मोपेडवरील कुटुंब मागच्या चाकाखाली आले असून एक महिला जागीच ठार झाली आहे. तर मोपेड चालक आणि एक ८ वर्षीय मुलगी जखमी झाले आहेत. गयाबाई भाऊसाहेब शिंदे असे मृत महिलेचे नाव आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, रोटेगाव येथील रहिवासी भाऊसाहेब शिंदे हे आपली पत्नी गयाबाई आणि ८ वर्षीय मुलीसोबत मोपेडवरून वैजापूरला येत होते. काही अंतर पार केल्यास बाजारा फार्म जवळ पाठीमागून वेगाने येणाऱ्या टँकरने त्यांना ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. यावेळी टँकरचा मोपेडला धडक बसली व त्यावरील तिघे खाली कोसळली. यावेळी गयाबाई या टँकरच्या मागील चाकाखाली आल्या. त्यांच्या डोक्यावरून मागील चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर भाऊसाहेब व त्यांची ८ वर्षीय मुलगी दूर फेकल्या गेल्याने गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान, पोलिसांनी टँकर चालकास अटक केली आहे. 

Web Title: speedy tanker hits mopeds in an attempt to move forward; The woman was killed on the spot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.