राधास्वामी कॉलनी समस्यांच्या गर्तेत;गैरसोयीमुळे विद्यार्थी व वृद्धांसह सर्वच त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 06:35 PM2019-07-22T18:35:08+5:302019-07-22T18:39:24+5:30

सुविधा पुरविण्यासाठी मनपाचे दुर्लक्ष  

Radhaswamy colony suffers from problem; Inauspicious, students and aged suffer all | राधास्वामी कॉलनी समस्यांच्या गर्तेत;गैरसोयीमुळे विद्यार्थी व वृद्धांसह सर्वच त्रस्त

राधास्वामी कॉलनी समस्यांच्या गर्तेत;गैरसोयीमुळे विद्यार्थी व वृद्धांसह सर्वच त्रस्त

googlenewsNext
ठळक मुद्देबाराही महिने टँकरवर अवलंबून कॉलनीच्या प्रवेशद्वारावरच मनपाचे कर्मचारी दररोज कचरा जाळतात

- साहेबराव हिवराळे 
औरंगाबाद : जटवाडा रोडवर १५ वर्षांपूर्वी वसलेल्या राधास्वामी कॉलनीचे नागरिक महापालिकेचे सर्व कर भरतात; परंतु मनपाने अद्यापही ना अंर्तगत रस्ते केले ना जलवाहिनी टाकली. त्यामुळे १२ महिने टँकरच्या पाण्यावर तहान भागविणाऱ्या नागरिकांना पावसाळ्यात गुडघाभर पाणी व चिखल तुडवत घर गाठावे लागते. मुख्य रस्ता वगळता अंतर्गत रस्त्यावर निव्वळ दलदलपुरी झाली आहे. त्यातच कॉलनीच्या प्रवेशद्वारावरच मनपाचे कर्मचारी दररोज कचरा जाळून प्रदूषण वाढवितात.

राधास्वामी कॉलनी, गायकवाड सोसायटीतील नागरिकांना मूलभूत सोयी-सुविधांसाठी सतत संघर्ष करावा लागत आहे. राधास्वामी कॉलनीतील सत्संग भवनामागे सांडपाण्याचे डबके बाराही महिने तुंबलेले असते. पाण्याची दुर्गंधी सहन करीतच ये-जा करावी लागते. मनपाच्या आरोग्य विभागाने या परिसरात औषधाची फवारणी करणे गरजेचे आहे. सांडपाण्यामुळे डासांचा त्रास वाढला असून, आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. इतर परिसरात जलवाहिनी टाकलेली आहे; परंतु राधास्वामी कॉलनीत टँकर किंवा जारच्या पाण्याशिवाय पर्यायच नाही. आटलेल्या बोअरवेला सध्या पावसामुळे पाणी आले असले तरी ते उन्हाळ्यापर्यंत टिकत नाही. 

...अन्यथा आंदोलन 
कॉलनीतील रस्ते, पाणी, औषध फवारणी, तसेच आरोग्यसेवेचा प्रश्न गंभीर बनला आहे. गाºहाणी मांडूनही सेवा-सुविधा देण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. लवकरच मनपा कार्यालयावर मोर्चा काढून आंदोलन छेडण्याचा इशारा सुनीता तारगे, सरिता शिंदे, सलिमाबी शेख, शेख अब्दुल रहेमान, दीपाली इखणकर, रेखा बाविस्कर, भारती गायकवाड, आदित्य सदाशिवे, विशाल आधाने, प्रदीप नलावडे, शुभम गायकवाड आदींनी दिला आहे.

नागरिकांच्या मते...
कचऱ्याला लावतात आग

महानगरपालिकेने सफाई अभियान राबविले. कचरागाड्या गल्लीबोळांत फिरवून जमा केलेला कचरा कॉलनीच्या प्रथमदर्शनी तोंडावर आणून जाळला जातो. त्यामुळे प्रदूषण वाढून नागरिकांचे आरोग्य बिघडत आहे. -गणेश दौड 

घाण पाण्यातून वाट
मोर्चा काढून व गाºहाणी मांडून नागरिक थकले आहेत; परंतु रस्त्यावर तुंबलेल्या डबक्याचा बंदोबस्त झाला नाही. नाइलाजास्तव घाण पाण्यातून वाट काढीत जावे लागते. वयोवृद्ध येथे अनेकदा घसरून पडून जखमी झाले आहेत. -सुनीता बाविस्कर 

खाजगी ड्रेनेज लाईन 
परिसरात अनेकांनी खाजगी मलनिस्सारण वाहिनी टाकलेली असून, ती सतत तुंबते. तिच्या दुरुस्तीसाठी मनपाचे कर्मचारी वेळेवर येत नाहीत. नवीन गल्लीत मनपाने मलनिस्सारण वाहिनी टाकून सांडपाण्याची विल्हेवाट लावावी.  - रमेश तारगे 

नळाने पाणीपुरवठा करा
शहरात ज्याप्रमाणे जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा केला जातो त्याचप्रमाणे विविध गल्ल्यांत पाणी-पुरवठ्यासाठी  जलवाहिनी टाकावी. कर अदा केले असताना टँकरसाठीचा मोठा भुर्दंड दर महिन्याला सहन करावा लागत आहे. - सागरबाई दांडगे 

स्वखर्चाने टाकतात मुरूम-माती 
वॉर्डातील मुख्य रस्ता सिमेंट काँक्रीटचा असला तरी राधास्वामी कॉलनी व गायकवाड सोसायटीत घुसण्यासाठी चिखलच तुडवावा लागतो. स्वखर्चाने मुरूम-माती टाकून रस्ते बनवावे लागतात. अतिक्रमण वाढल्याने घरापर्यंत वाहन आणणे किंवा शाळकरी विद्यार्थी वाहतूक करणाऱ्यांना त्रासदायक ठरत आहे.  
- शेख जावेद शेख रफिक

Web Title: Radhaswamy colony suffers from problem; Inauspicious, students and aged suffer all

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.