औरंगाबाद रेल्वे दुर्घटनेतील 16 मृतांची नावं; जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2020 01:08 PM2020-05-08T13:08:29+5:302020-05-08T13:08:47+5:30

घराच्या ओढीने सर्व मजूर पायी रेल्वे रुळाच्या मार्गे निघाले होते. सटाणा परिसरात ते रुळावर झोपले असताना मालगाडीने त्यांना चिरडले.

Names of those killed in Aurangabad train accident vrd | औरंगाबाद रेल्वे दुर्घटनेतील 16 मृतांची नावं; जाणून घ्या

औरंगाबाद रेल्वे दुर्घटनेतील 16 मृतांची नावं; जाणून घ्या

googlenewsNext

सटाणा : औरंगाबाद तालुक्यातील सटाणा शिवारात रेल्वे रुळावर थकून झोपलेले १६ मजूर मालवाहू रेल्वेखाली चिरडले गेल्यानं राज्यात एकच खळबळ उडाली आहे. सर्व मजूर मध्य प्रदेश येथील असून, ते जालना येथे लॉकडाऊनमध्ये अडकले होते. घराच्या ओढीने सर्व मजूर पायी रेल्वे रुळाच्या मार्गे निघाले होते. सटाणा परिसरात ते रुळावर झोपले असताना मालगाडीने त्यांना चिरडले. यातील १४ जणांचा जागेवर मृत्यू झाला, दोघांचा 2 उपचाराला नेताना मृत्यू झाला आणि 3 जखमी आहेत, यातील एकाने ही माहिती दिली आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, जालना येथील एका कंपनीत मध्य प्रदेश येथील १९ मजूर काम करतात. कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनमुळे हे मजूर जालना येथे अडकले गेले. दरम्यान, शासनाने परप्रांतीय मजुरांना घरी जाण्यासाठी विशेष रेल्वे सुरू केल्या आहेत, अशी माहिती या मजुरांना मिळाली. तसेच भुसावळ येथून मध्य प्रदेशला रेल्वे जाणार असल्याची माहिती या १९ मजुरांना मिळाली असता पोलिसांचा ससेमिरा चुकविण्यासाठी ते रेल्वे रुळाच्या मार्गे औरंगाबादच्या दिशेने चालत निघाले. सटाणा परिसरात रात्री थकून हे मजूर रेल्वे रुळावर झोपले. पहाटे अचानक एक मालवाहू रेल्वे त्यांच्या दिशेने आली. काही कळायच्या आत १६ मजूर रेल्वे खाली चिरडले गेले, तर दोघे गंभीर जखमी असून तिघे प्राण वाचविण्यात यशस्वी झाले आहेत. 

औरंगाबाद रेल्वे अपघातातील मृतांची नावं

1)धनसिंग गोंड रा. अंतवळी जी. शाहडोल, राज्य - मध्य प्रदेश.
2) निरवेश सिंग गोंड, अंतवळी जी. शाहडोल, मध्य प्रदेश
3) बुद्धराज सिंग गोंड, रा. अंतवळी जी. शाहडोल, मध्य प्रदेश
4) अच्छेलाल सिंग, चिल्हारी, मानपुर जी. उमरिया मध्य प्रदेश
5) रबेंन्द्र सिंग गोंड, रा. अंतवळी, जी. शाहडोल, मध्य प्रदेश
6) सुरेश सिंग कौल, जी. सडोळ, मध्य प्रदेश
7) राजबोहरम पारस सिंग, रा. अंतवळी, जी. शाहडोल, मध्य प्रदेश
8) धर्मेंद्रसिंग गोंड, रा. अंतवळी, जी. शाहडोल, मध्य प्रदेश
9) बिगेंद्र सिंग चैनसिंग, रा. ममाज, तहसील पाळी, जी. उमरिया, मध्य प्रदेश
10) प्रदीप सिंग गोंड, रा. जमडी, तहसील पाळी, जी. उमरिया, मध्य प्रदेश
11) संतोष नापित, 
12) ब्रिजेश भेयादीन रा. बहिरा इटोला, शहरगड चाटी, सहडोल.
13) मुनीमसिंग शिवरतन सिंग, रा. नेवासा, पोस्ट, बकेली तहसली पाळी, जी. उमरिया.
14) श्रीदयाल सिंग रा. अंतवळी जी. शाहडोल, मध्य प्रदेश
15) नेमशाह सिंग चमदु सिंग, रा. नेवासा, पोस्ट बकेली, जी. उमरिया.
16) दिपक सिंग अशोक सिंग गौड  रा. अंतवळी जी. शाहडोल, मध्य प्रदेश
---------------------
जखमी व्यक्ती :-
1) सज्जनसिंग माखनसिंग धुर्वे, रा. पोंडी, ता. जुनावणी, जिल्हा मंडल खजेरी
जिवंत प्रत्यक्षदर्शी मजूर:-
1) इंद्रलाल कमलसिंग धुर्वे (वय 20 वर्ष), रा. पोवडी, ता. घोगरी, जिल्हा मांडला
2) वेरेंद्रसिंग चेंनसिंग गौर (वय 27 वर्ष),  रा. ममान, ता. पाली, जिल्हा उमरिया
3) शिवमानसिंग हिरालाल गौर (वय 27 वर्ष) रा. शाहारगड, ता. शाही, जिल्हा शाहडोल
 

Web Title: Names of those killed in Aurangabad train accident vrd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.