Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी तरुणाचा फेसबूक लाइव्ह करून आत्महत्येचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2021 08:24 PM2021-01-20T20:24:58+5:302021-01-20T20:26:40+5:30

Maratha Reservation Update : मराठा आरक्षण न्यायालयीन लढाईत अडकले आहे. त्यामुळे मराठा समाजात असंतोष आहे.

Maratha Reservation : Suicide attempt by a youth for Maratha reservation by using Facebook live | Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी तरुणाचा फेसबूक लाइव्ह करून आत्महत्येचा प्रयत्न

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी तरुणाचा फेसबूक लाइव्ह करून आत्महत्येचा प्रयत्न

googlenewsNext

औरंगाबाद - मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुरू असणारी सुनावणी आता ५ फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलली आहे. त्यामुळे मराठा समाजात पुन्हा एकदा असंतोष वाढू लागला आहे. दरम्यान, मराठा आरक्षणासाठी औरंगाबादमधील क्रांती चौकात मराठा संघटनांचे आंदोलन सुरू असून, या ठिकाणी मराठा समाजातील एका तरुणाने विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.

मराठा आरक्षणासाठी मराठा समाजाने तीव्र आंदोलन करून मुक मोर्चे काढल्यानंतर राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याची घोषणा केली होती. मात्र सध्या हे आरक्षण न्यायालयीन लढाईत अडकले आहे. त्यामुळे मराठा समाजात असंतोष आहे. दरम्यान, आज औरंगाबादमधील क्रांती चौकात मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू होते. त्या ठिकाणी दत्ता भोकरे या तरुणाने फेसबूक लाइव्ह करत मराठा आरक्षाची मागणी केली. तसेच विषप्राशन केले.

दरम्यान, या तरुणाला पोलिसांनी वेळीच ताब्यात घेऊन उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले आहे. मात्र मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनादरम्यान, तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे.

Web Title: Maratha Reservation : Suicide attempt by a youth for Maratha reservation by using Facebook live

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.