कुख्यात टिप्याने पोलिसांना पाहताच बाईकवरून मारली उडी; साथीदार गावठी पिस्टलसह अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 14:27 IST2021-02-25T14:25:45+5:302021-02-25T14:27:27+5:30

Crime News समोर पोलिस असल्याचे पाहून साथीदाराच्या दुचाकीवर मागे बसलेला आरोपी शेख जावेद उर्फ टिप्प्या दुचाकीवरून उडी मारून पळून गेला.

The infamous Tipya jumped off the bike as soon as he saw the police; Companion arrested with gavthi pistol | कुख्यात टिप्याने पोलिसांना पाहताच बाईकवरून मारली उडी; साथीदार गावठी पिस्टलसह अटकेत

कुख्यात टिप्याने पोलिसांना पाहताच बाईकवरून मारली उडी; साथीदार गावठी पिस्टलसह अटकेत

ठळक मुद्देसाथीदार शेख सोहेल दुचाकी दामटण्याचा तयारीत असताना पोलिसांनी त्याला मोठ्या शिताफीने पकडले.गाडीच्या सीटखाली लपवून ठेवलेले गावठी पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे पोलिसांना आढळून आली.

औरंगाबाद:  पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार शेख जावेद उर्फ टिप्याने पोलिसाना पाहून दुचाकीवरुन उडी घेऊन धूम ठोकली तर त्याचा साथीदाराला गावठी पिस्टलसह पोलिसांनी मोठ्या शिताफीने पकडले. ही कारवाई बुधवारी रात्री विजयनगर चौकात करण्यात आली.

शेख सोहेल शेख बादशहा(२६, रा.रहीम नगर,बायपास )असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. याविषयी पुंडलिक नगर पोलिसांनी सांगितले की, कुख्यात गुन्हेगार टिप्या हा त्याच्या साथीदारांसह बायपासकडुन विजय नगरमार्गे पुंडलिक नगरकडे दुचाकीवर बसून येत आहे. त्याच्या जवळ गावठी पिस्टल असल्याची पक्की खबर सहाय्यक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे त्यांना मिळाली. यानंतर रात्री सात वाजेच्या सुमारास सपोनि सोनवणे, फौजदार धनाजी आढाव, हवालदार रमेश सांगळे,बाळाराम चौरे,राजेश यदमळ,शिवाजी गायकवाड,रवी जाधव,दीपक जाधव,विलास डोईफोडे,अजय कांबळे,प्रवीण मुळे,यांच्या पथकाने आरोपींना पकडण्यासाठी विजय नगर चौक सापळा रचला. 

समोर पोलिस असल्याचे पाहून साथीदाराच्या दुचाकीवर मागे बसलेला आरोपी शेख जावेद उर्फ टिप्प्या दुचाकीवरून उडी मारून पळून गेला. यावेळी त्याचा साथीदार शेख सोहेल दुचाकी दामटण्याचा तयारीत असताना पोलिसांनी त्याला मोठ्या शिताफीने पकडले. पंचांसमक्ष त्याच्या दुचाकीची झडती घेतली असता. सीटखाली लपवून ठेवलेले गावठी पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे पोलिसांना आढळून आली. याप्रकरणी पोलीस हवालदार बाळाराम चौरे यांच्या तक्रारीवरून पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात आरोपी टिप्यासह शेख सोहेलविरुद्ध  गुन्हा दाखल करण्यात आला. 

शस्त्र विक्री करण्यासाठी जात असताना आरोपी पकडला 
आरोपी टिप्या आणि त्याचा साथीदार सोहेल गावठी पिस्टल विक्री करण्यासाठी ग्राहक शोधण्यासाठी घराबाहेर पडले होते. आरोपी सोहेल हा वाळू विक्रीचा व्यवसाय करतो. त्याच्याविरुद्ध मारहाण करणे, जमिनीवर अतिक्रमण करणे आधी स्वरूपाची गुन्हे दाखल असल्याचे पुंडलिक नगर पोलिसांनी सांगितले.

Web Title: The infamous Tipya jumped off the bike as soon as he saw the police; Companion arrested with gavthi pistol