उच्चदाब विद्युत वाहिनीला स्पर्श झाल्याने हायवाने घेतला पेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2019 06:13 PM2019-11-14T18:13:26+5:302019-11-14T18:43:26+5:30

ही घटना सिल्लोड-कन्नड रस्त्यावर भराडी जवळ घडली. 

Hayava get fire due to high pressure electric cable touched on highway | उच्चदाब विद्युत वाहिनीला स्पर्श झाल्याने हायवाने घेतला पेट

उच्चदाब विद्युत वाहिनीला स्पर्श झाल्याने हायवाने घेतला पेट

googlenewsNext

सिल्लोड: सिल्लोड-कन्नड मार्गाच्या कामासाठी मुरूम टाकत असताना लिफ्टरला उच्चदाब विद्युत वाहिनीचा स्पर्श झाल्याने एक हायवा ट्रक जागीच जळून खाक झाला. ही घटना सिल्लोड-कन्नड रस्त्यावर भराडी जवळ घडली. 

याबाबत अधिक माहिती अशी की, सिल्लोड-कन्नड रस्त्याचे काम सुरु आहे. यावेळी भराडी जवळ सुरु असलेल्या कामासाठी एक हायवा ट्रक रस्त्याच्या भरावासाठी मुरूम घेऊन आला होता. मुरूम टाकत असताना हायवाच्या लिफ्टरचा रस्त्याच्या वरून जाणाऱ्या उच्चदाब विद्युत वाहिनीला स्पर्श झाला. घर्षणामुळे तिथे आगीच्या लोटासह मोठ्याप्रमाणावर ठिणग्या पडल्या. यावेळी झालेल्या मोठ्या आवाजाने प्रसंगावधान राखत चालकाने हायवामधून वेळीच उडी मारली. 

Web Title: Hayava get fire due to high pressure electric cable touched on highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.