तलवार, काठी आणि दगडांनी तुफान हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2020 08:13 PM2020-09-27T20:13:32+5:302020-09-28T12:52:09+5:30

जाफर गेट ते मोंढा नाका या मार्गावरील एका संपत्तीवरून रविवारी सायंकाळी दोन गटात तलवार, काठी व दगडांच्या साहाय्याने तुफान हाणामारी झाली.

Fighting with swords, sticks and stones | तलवार, काठी आणि दगडांनी तुफान हाणामारी

तलवार, काठी आणि दगडांनी तुफान हाणामारी

googlenewsNext

औरंगाबाद : मोंढ्यातील जाफरगेटजवळ गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या दोन गटांत रविवारी दुपारी ४: ३० वा. दर्ग्याच्या जागेवरून चांगलेच टोळीयुद्ध झाले. तलवार, लोखंडी रॉड आणि लाठ्याकाठ्यांनी तुंबळ हाणामारी झाली. याप्रकारणी क्रांतीचौक व जिन्सी ठाण्यात दंगल, हाणामारी, दहशत निर्माण करणे आदी परस्परविरोधी चार गुन्हे दाखल झाले आहेत. याच प्रकारच्या मागील काही घटनांमुळे शहरात टोळीयुद्धाचे वातावरण दिसते आहे. 

या घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त निखिल गुप्ता, उपायुक्त निकेशा खाटमोडे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी वेळीच धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळला. दरम्यान, दोन्ही गटांनी जाफरगेटजवळील पेट्रोल पंपाजवळ दगडफेक करीत उभ्या असलेल्या वाहनांची तोडफोड केली. अचानक सुरू झालेली हाणामारी, दगडफेक पाहून बाजारातील ग्राहकांची एकच धावपळ उडाली. 

जाफरगेटजवळ गिरणी मैदानात कादर शहा अवलिया दर्गाची आठ एकर जमीन आहे. ही जागा मोंढ्यातील एका व्यापाऱ्याला लीजवर दिली होती. लीजची मुदत संपुष्टात आल्यामुळे त्या जागेवर दोन्ही गटांकडून दावा करण्यात आला आहे. रविवारी दुपारी जमिनीच्या वादावरून मुश्ताक बिल्डर आणि कटकटगेट येथील अलीम खान यांचे दोन्ही गट आमने- सामने आले व तलवारी, लोखंडी रॉड आणि लाठ्याकाठ्यांनी एकमेकांवर तुफान हल्ला सुरू केला. त्यामुळे आठवडी बाजारात एकच धावपळ उडाली. 

अलीम खान यांच्या गटाकडून जोरदार हल्ला सुरू झाल्यामुळे मुश्ताक बिल्डर यांच्या समर्थकांनी तेथून पळ काढला. तरीही पाठलाग करून त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. या घटनेत दोन महिलांसह ८ जण जखमी झाले. 

सय्यद नबी पाशा, अलीम खान यांच्या गटातील नेमके किती जण जखमी झाले आहेत, ते समजू शकले नाही. क्रांतीचौक ठाण्यात दाखल दोन गुन्ह्यांत उपनिरीक्षक सोनटक्के व शिंदे हे तपास करीत आहेत. 

Web Title: Fighting with swords, sticks and stones

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.