Fifteen days ago, a married youth killed; death bady found near Gogababa hill | पंधरा दिवसांपूर्वी लग्न झालेल्या युवकाची हत्या; गोगाबाबा टेकडीखाली मृतदेह फेकला

पंधरा दिवसांपूर्वी लग्न झालेल्या युवकाची हत्या; गोगाबाबा टेकडीखाली मृतदेह फेकला

ठळक मुद्देतरुण एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करत असे पहिल्या बायकोचा बाळंतपणात झाला मृत्यू

औरंगाबाद : पंधरा दिवसापूर्वी लग्न झालेल्या एका युवकाची गळा आवळून हत्या करून मृतदेह गोगाबाबा टेकडीच्या पायथ्याशी टाकल्याची घटना बुधवारी (दि.१८ )  सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास उघडकीस आली. शेख शफिक शेख रफिक ( रा. जयसिंगपुरा ) असे मृत युवकाचे नाव आहे. 

या घटनेबाबत पोलीस निरीक्षक सचिन सानप म्हणाले की, मयत शफिक हा घाटी प्रवेशद्वारजवळील बाबू टी हाउस येथे वेटर होता . त्याची पहिली पत्नी वर्षभरापूवी बाळंतपणात मयत झाली होती. त्यास पहिल्या पत्नीचा एक मुलगा आहे. ३० ऑगस्ट रोजी त्याचे दुसरे लग्न झाले. लग्न झाल्यापासून तो कामावर गेला नव्हता. त्याने कामाच्या मजूरीतून मिळविलेले पैसे एका गल्ल्यात ठेवले होते. हे पैसे घेउन तो मंगळवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास बारतंबाखू खाण्यासाठी टाउन हॉल येथील एका पान टपरीवर गेला. टपरीवर तंबाखू आणि चूना घेतल्यानंतर शफिक बेगमपुराकडे पायी निघाला. मात्र यानंतर तो घरी परतलाच नाही .  

दरम्यान बुधवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास महावितरणच्या लाईनमनला शफिक मृतावस्थेत पडलेला दिसला. त्यांनी या घटनेची माहिती बेगमपुरा पोलिसांना कळविली. पोलीस निरीक्षक सचिन सानप आणि पोलीस उपनिरीक्षक सय्यद सिद्दिकी , गुन्हेशाखेचे निरीक्षक मधुकर सावंत  यांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर पोलिसांनी पंचनामा करुन मृतदेह शवविछेदनासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात दाखल केला गुन्हेशाखा आणि बेगमपुरा ठाण्याचे पथक आरोपीचा शोध घेत आहेत .

Web Title: Fifteen days ago, a married youth killed; death bady found near Gogababa hill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.