Exciting! Three members of the same family were stabbed to death with a sharp weapon; The boy who was left dead was rescued | पैठण हादरले! एकाच कुटुंबातील तीन जणांची धारदार शस्त्राने हत्या; सुदैवाने मुलगा बचावला

पैठण हादरले! एकाच कुटुंबातील तीन जणांची धारदार शस्त्राने हत्या; सुदैवाने मुलगा बचावला

ठळक मुद्देपती पत्नी आणि दहा वर्षीय मुलीची हत्यागंभीर जखमी मुलावर औरंगाबाद येथे उपचार सुरू

पैठण : शनिवारी मध्यरात्री संपूर्ण कुटुंब संपविण्याच्या उद्देशाने मारेकऱ्यांनी केलेल्या हल्ल्यात एकाच कुटुंबातील तीन जणांचा धारदार शस्त्राने भोसकून खुन करण्यात आला.  घरातील सहा वर्षाचा मुलगा मारेकऱ्यांनी मृत झाला असे समजून सोडून दिल्याने सुदैवाने तो बचावला आहे. गंभीर जखमी झालेल्या मुलास उपचारासाठी रूग्णालयात हलविण्यात आले असून सदर घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. 

पैठण शहरालगत नाथमंदीरा पाठीमागील गोदावरी  काठावर असलेल्या जुने कावसन या गावात शनिवारी  मध्यरात्री  पती, पत्नी व मुलगी अशा तीन जणांची धारदार शस्त्राने भोसकून खुन करण्यात आला आहे.  राजू निवारे  (४०) आश्विनी राजु  निवारे (३५) व मुलगी (१०) अशी खुन झालेल्यांची  नावे आहेत. मारेकऱ्यांनी निवारे कुटुंबातील सहा वर्षाचा मुलगा सोहम निवारे याच्यावरही वार केला असून  गंभीर अवस्थेत त्यास उपचारासाठी औरंगाबाद येथे हलविण्यात आले आहे. 

पोलीस उप अधिक्षक गोरख भामरे, पोलीस निरीक्षक किशोर पवार, फौजदार छोटुसिंग गिरासे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देवून पाहणी केली.  मृतदेह पंचनामा करून शवविच्छेदन करण्यासाठी  पैठण येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक भागवत फुंदे यांनी घटनास्थळास भेट देऊन पाहणी केली आहे.

Web Title: Exciting! Three members of the same family were stabbed to death with a sharp weapon; The boy who was left dead was rescued

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.