महाशिवरात्रीनिमित्त वेरूळ येथील घृष्णेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांची रीघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2020 02:39 PM2020-02-21T14:39:45+5:302020-02-21T19:09:43+5:30

हर हर महादेव , ओम नम: शिवायचा जयघोष करत हजारो भाविकांनी दर्शन घेतले.

devotees gathering for Ghrushaneshwara at Veraul for Mahashivratri | महाशिवरात्रीनिमित्त वेरूळ येथील घृष्णेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांची रीघ

महाशिवरात्रीनिमित्त वेरूळ येथील घृष्णेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांची रीघ

googlenewsNext

- सुनील घोडके 

खुलताबाद  : महाशिवरात्री निमित्त  वेरूळ येथील बारावे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर मंदीरात रात्री बारावाजेपासून दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली. भाविकांच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यावेळी हर हर महादेव , ओम नम: शिवायचा जयघोष करत हजारो भाविकांनी दर्शन घेतले.  

वेरूळ येथे महाशिवरात्रीनिमित्त मोठी यात्रा भरते. दुपारी चार वाजता पालखी सवाद्य मिरवणुक शिवालय तीर्थकुंडावर जाते तेथे महापुजा झाल्यानंतर परत वाजत गाजत मंदीरात येते. रात्री बारा वाजता शासकीय महापुजा जिल्हाधिकारी उदय चौधरी व पोलीस अधीक्षक ग्रामीण मोक्षदा पाटील तसेच माजी खा. चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते होणार आहे. 

दरम्यान, दिवसभर भाविकांची मोठी गर्दी होणार असल्याने मंदिर परिसरात पोलीसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. औरंगाबाद ते वेरूळ महामार्गावर जादा बसेसची व्यवस्थासुधा करण्यात आली आहे. महाशिवरात्री निमित्त मंदीरात महाप्रसादाचे वाटप तसेच रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

Web Title: devotees gathering for Ghrushaneshwara at Veraul for Mahashivratri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.