coronavirus: The number of patients admitted in Aurangabad district again on the threshold of four thousand | coronavirus : औरंगाबाद जिल्ह्यात भरती रुग्णांची संख्या पुन्हा चार हजाराच्या उंबरठ्यावर

coronavirus : औरंगाबाद जिल्ह्यात भरती रुग्णांची संख्या पुन्हा चार हजाराच्या उंबरठ्यावर

ठळक मुद्देसोमवारी जिल्ह्यात ७४ रुग्णांची वाढ५ बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू

औरंगाबाद : जिल्ह्यातील ७४ रुग्णांचे अहवाल सोमवारी सकाळी पॉझिटिव्ह आले. तर पाच बाधितांचे उपचारादरम्यान मृत्यू झाले. रुग्णवाढ, मृत्यूसत्र सुरूच असून भरती रुग्णसंख्या पुन्हा एकदा चार हजाराच्या उंबरठ्यावर पोहचली असल्याने चिंतेत वाढ झाली आहे. 

आतापर्यंत कोरोनाबधित रुग्णांची संख्या १६ हजार ८२७ एवढी झाली आहे. त्यापैकी १२ हजार ३४६ बरे झाले तर ५५४ जणांचा मृत्यू झाला असल्याने सध्या ३९२७ जणांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. 

--
पाच कोरोनाबाधितांचा मृत्यू
--
खासगी रुग्णालयांमध्ये नारेगावातील ५८, गारखेड्यातील ३२ वर्षीय स्त्री, मुकुंदवाडीतील ५८, बीड बायपास येथील ६२ आणि जय भवानी नगरातील ३२ वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आतापर्यंत जिल्ह्यातील बाधित मृतांचा आकडा ५५४ झाला आहे.
--
शहरात आढळले ५५ रुग्ण
--
एन नऊ, सिडको १, बनेवाडी ४, नगारखाना गल्ली २, अजब नगर १, प्रियदर्शनी कॉलनी,सिडको १, कांचनवाडी १, हिंदुस्तान आवास, कांचनवाडी २, श्रीकृष्ण नगर १, मिलिट्री हॉस्पीटल १, ध्यान मंदिर, नारळीबाग १, साईकृपा सो., बजरंग चौक, एन सहा सिडको १, अन्य १, नाझलगाव १, घाटी परिसर १, एन आठ, आझाद चौक १, गजानन नगर १, श्रेय नगर १, शिवाजी नगर २, जवाहर नगर ४, गुरूदत्त नगर १, हर्सुल टी पॉइंट १, गणेश कॉलनी १, सह्याद्री  हिल १, न्याय नगर २, एन दोन, पायलट बाबा नगर १, बालाजी नगर ३, गांधी नगर ४, नवयुग कॉलनी, भावसिंगपुरा १, राजीव गांधी नगर, मुकुंदवाडी ३, एन चार सिडको १, खंडोबा मंदिराजवळ, सातारा परिसर ८
--
ग्रामीण भागात १९ रुग्ण
--
करमाड ३, गोपाळपूर १, वाळूज ४, पाचोड, पैठण १, बजाज नगर १, सारा वृंदावन सो., बजाज नगर १, देवगिरी सो., बजाज नगर २, छत्रपती नगर, वडगाव १, गोपीनाथ चौक, बजाज नगर १,  पिशोर, कन्नड १, चित्तेगाव १, मेन रोड, ‍सिल्लोड १, पैठण १.

Web Title: coronavirus: The number of patients admitted in Aurangabad district again on the threshold of four thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.