coronavirus : आणखी पाच रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह; शहर कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यापासून दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2020 12:50 PM2020-03-19T12:50:25+5:302020-03-19T12:51:07+5:30

प्राध्यापिकेच्या संपर्कातील अन्य लोकांचा अहवाल काय येतो, याकडे आरोग्य विभागाचे लक्ष लागले आहे.

coronavirus : Another five patients reported negative; Away from the second phase of the city Corona | coronavirus : आणखी पाच रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह; शहर कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यापासून दूर

coronavirus : आणखी पाच रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह; शहर कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यापासून दूर

googlenewsNext

औरंगाबाद : कोरोना बाधित महिलेच्या अत्यंत जवळ संपर्कात असलेल्या एका महिलेचा कोरोनाचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर आता आणखी पाच संशयितांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यामुळे आरोग्य यंत्रणेने शहर कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यापासून दूर असल्याचे निष्कर्ष काढला असून हे चित्र शहरवासियांसाठी दिसालादायक आहे.

कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात परदेशातून येणाऱ्यांना, दुसऱ्या टप्प्यात परदेशातून आलेल्या लोकांच्या संपर्कातील लोकांना बाधा होते. सदर सहयोगी प्राध्यापिकेचा अहवाल नकारात्मक आल्याने अद्याप तरी शहर कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यात नाही. प्राध्यापिकेच्या संपर्कातील अन्य लोकांचा अहवाल काय येतो, याकडे आरोग्य विभागाचे लक्ष लागले आहे.

शैक्षणिक संस्थेतील २० जणांचे घेतले स्वॅब
कोरोना पॉझिटिव्ह प्राध्यापिका कार्यरत शैक्षणिक संस्थेतील २० जणांच्या लाळेचे नमुने (स्वॅब)  घेण्यात आले. आगामी २ ते ३ दिवसांत या सर्वांचा तपासणी अहवाल मिळणे अपेक्षित आहे.४या संस्थेतील विद्यार्थी, प्राध्यापक आणि कर्मचारी, अशा ७२६ जणांची तपासणी करण्यात आली. प्राथमिक तपासणीत कोणामध्येही लक्षणे आढळून आलेली नाहीत. खबरदारी म्हणून संस्थेतील विद्यार्थ्यांना वसतिगृहात राहण्याची सूचना केली आहे. येथील २० जणांचे स्वॅब बुधवारी घेण्यात आले. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस. व्ही. कुलकर्णी यांंनी यास दुजोरा दिला.४हे सर्व जण आता कोरोना संशयित असून, त्यांचा अहवाल काय येतो, याकडे आरोग्य अधिकाऱ्यांचे लक्ष लागले आहे. संशयितांची संख्या वाढत असल्याने चिंताही व्यक्त केली जात आहे. 

नऊ कोरोना संशयितांचे घेतले स्वॅब; १४ जणांच्या अहवालाची प्रतीक्षा
खाजगी रुग्णालयात दाखल केलेल्या कोरोना पॉझिटिव्ह प्राध्यापिकेच्या कुटुंबियांसह वाहनचालक, स्वयंपाकी आणि परदेश प्रवासात सोबत असलेल्या महिलेचा जिल्हा सामान्य रुग्णालयात तपासणीसाठी बुधवारी (दि.१८) स्वॅब घेण्यात आला. दिवसभरात ९ कोरोना संशयितांचे स्वॅब तपासणीसाठी पुण्याच्या ‘एनआयव्ही’कडे पाठविण्यात आले. प्राध्यापिकेच्या संपर्कातील लोकांची प्राधान्याने तपासणी करण्यावर भर देण्यात येत आहे. सध्या कोणतीही लक्षणे दिसत नसली तरीही स्वॅब घेऊन तपासणीची खबरदारी जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून घेतली जात आहे. यानुसार बुधवारी प्राध्यापिकेच्या कुटुंबातील ३ सदस्यांसह वाहनचालक, स्वयंपाकीचा स्वॅब घेण्यात आला. तसेच परदेशातील प्रवासात सोबत असलेल्या महिलेचाही स्वॅब घेण्यात आला. दिवसभरात ९ जणांचे स्वॅब घेण्यात आले आहेत, अशी माहिती रुग्णालय प्रशासनातर्फे देण्यात आली. जिल्हा रुग्णालयात मंगळवारी ५ संशयितांचे स्वॅब घेण्यात आले. यामुळे संशयितांची संख्या १४ झाली आहे. त्यांचा अहवाल काय येतो, याकडे आरोग्य विभागाचे लक्ष लागले आहे. स्वॅब घेतलेल्यांपैकी २ रुग्ण दाखल झाले. तर अन्य लोकांना घरीच राहण्याचा सल्ला देण्यात आला. आयसोलेशन वॉर्डात सध्या ४ रुग्ण दाखल असल्याची माहिती जिल्हा रुग्णालयातर्फे देण्यात आली.

Web Title: coronavirus : Another five patients reported negative; Away from the second phase of the city Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.