coronavirus: 28 corona infected in Aurangabad; The number of patients reached 1487 | coronavirus : औरंगाबादेत २८ बाधितांची वाढ; १४८७ वर पोहचली रुग्णसंख्या

coronavirus : औरंगाबादेत २८ बाधितांची वाढ; १४८७ वर पोहचली रुग्णसंख्या

औरंगाबाद : जिल्ह्यात शनिवारी (दि.३०) सकाळी २८ रुग्णांची वाढ झाली. त्यामुळे एकूण कोरोना बाधितांची संख्या ‍१४८७ झाली आहे. यापैकी ९५४ रुग्ण बरे होऊन घरी परतले. आतापर्यंत ६९ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे. ४६४ रुग्णांवर उपचार सुरू आहे.

या भागात आढळले बाधीत

जुना बाजार २, मुझफ्फर नगर, हडको १, व्यंकटेश नगर १, सुराणा नगर २, नारळी बाग २, शिवशंकर कॉलनी २, हमालवाडी १, न्यु वस्ती जुनाबाजार १, भवानी नगर, जुना मोंढा ५, मनजीत नगर, आकाशवाणी परिसर १, शिवाजी नगर १, उस्मानपुरा ४, रेहमानिया कॉलनी १, रोशन गेट परिसर २, नारेगाव परिसर १, न्याय नगर १ या भागात रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये १८ पुरूष आणि १० महिलांचा समावेश आहे.

Web Title: coronavirus: 28 corona infected in Aurangabad; The number of patients reached 1487

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.