Coronavirus: 183 coronavirus cases in Aurangabad district till noon, 3 deaths | Coronavirus : औरंगाबाद जिल्ह्यात दुपारपर्यंत १८३ कोरोनाबाधितांची वाढ, ३ मृत्यू

Coronavirus : औरंगाबाद जिल्ह्यात दुपारपर्यंत १८३ कोरोनाबाधितांची वाढ, ३ मृत्यू

ठळक मुद्दे४१६२ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत ३४० जणांचा उपचारादरम्यान मृत्यू

औरंगाबाद : जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी १६० बाधितांची वाढ झाल्यानंतर दुपारी आणखी २३ बाधितांची भर पडली. तसेच शहरात उपचारादरम्यान तीन बाधितांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये जालना जिल्ह्यातील एका बाधिताचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ७८५५ कोरोनाबाधित आढळले असून त्यापैकी ४१६२ बरे झाले आहेत. ३४० जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर ३३५३ जणांवर उपचार सुरु आहेत. शुक्रवारी आढळलेल्या रुग्णांत १०१ पुरूष, ८२ महिला असून यात शहरी भागातील १४१ तर ४२ ग्रामीण भागातील बाधित आढळुन आले.

तीन बाधितांचा मृत्यू
गुरुवारी रात्री ८. ३० वाजता उस्मानपुरा येथील ७५ वर्षीय महिलेचा तर ११. ३० वाजता रहेमानगंज जालना येथील रुग्णाचा घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर सिडको एन- ९ येथील एका ७४ वर्षीय महिलेचा खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असताना मृत्यू झाला. यामुळे जिल्ह्यातील आतापर्यंतचा कोरोनामृत्यूचा आकडा ३४० झाला आहे.

मनपा हद्दीत १४१ रुग्ण
हर्सूल १, आंबेडकर नगर १, घाटी परिसर २, विवेकानंद हॉस्पीटल परिसर १, ज्युबली पार्क, भडकल गेट १, मयूर पार्क, हडको ४, गणेशनगर १, जय विश्वभारती कॉलनी २, कोकणवाडी २, शिवाजीनगर ४, बीड बायपास १, रमानगर १, भारतनगर १,  सातारा परिसर ९, उत्तमनगर ६, शिवशंकर कॉलनी ९,  गजानननगर २, मातोश्रीनगर ३, मयूर पार्क ११, पद्मपुरा १, छावणी १, ज्योतीनगर २, चिकलठाणा २, बंजारा कॉलनी १, ठाकरेनगर १,  एन-२, सिडको १,  एन-६, सिडको ४, एन-१२, सिडको १, विठ्ठलनगर २, संजयनगर, मुकुंदवाडी १, सुरेवाडी १,  म्हाडा कॉलनी १, कैलासनगर ३, जयभवानीनगर १, विजयनगर १, विष्णूनगर, आकाशवाणी परिसर १२, जरीपुरा १, मोंढा नाका १, टीव्ही सेंटर १,  नागेश्वरवाडी ६, फिरदोस गार्डन् परिसर ३, शिवाजीनगर, गारखेडा १, पुंडलिकनगर १, लक्ष्मी कॉलनी १, आंबेडकरनगर २, भावसिंगपुरा २, शिव रेसिडन्सी, उल्कानगरी १, आदर्श कॉलनी, गारखेडा १, पीर बाजार, उस्मानपुरा १, नवजीवन कॉलनी २, कासलीवाल परिसर १, एन-११-१, रमानगर ७, गारखेडा २, नंदनवन कॉलनी १, शिवाजीनगर १, शिवाजीनगर, गारखेडा परिसर १, सिडको १, अन्य ४.

ग्रामीण भागात ४२ रुग्ण 
विश्व विजय सो., बजाजनगर १, पियूष विहार, बजाजनगर १, भगतसिंग नगर, बजाजनगर ४, गुरूदेव सो., मुंडे चौक, बजाजनगर १, गुरूकृपा सो.,  मुंडे चौक, बजाजनगर १, द्वारकानगरी, बजाजनगर १, रांजणगाव शेणपुजी, बजाजनगर १, बजाजनगर २, छत्रपतीनगर, बजाजनगर २, रांजणगाव, बजाजनगर १, जिजामाता सो., बजाजनगर १, वंजारवाडी १, कल्पतरू सो., पतीयाला बँकेजवळ १,  गजानननगर , स्वर्णपुष्प सो., बजाजनगर १, संत कॉलनी, वाळूज १, शिवालय चौक, बजाजनगर १, गणेश सो., बजाजनगर १, हतनूर, कन्नड ७, मनिषानगर, वाळूज १, मातोश्रीनगर, रांजणगाव २, जामा मस्जिदजवळ, वाळूज १, ओमसाईनगर, कमलापूर २, जवखेडा खु. ता. कन्नड १,  उंबरखेडा, कन्नड १, जदगाव, करमाड १, वाळूज १, वंजारवाडी १, नेहा विहार, तिसगाव, बजाजनगर १ या भागातील कोरोनाबाधित आहेत.

Web Title: Coronavirus: 183 coronavirus cases in Aurangabad district till noon, 3 deaths

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.