कॉंग्रेस-भाजपत राडा; भाजपत जाऊन पंचायत समितीचे उपसभापती झालेल्या अर्जुन शेळकेंना मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2021 05:38 PM2021-08-02T17:38:03+5:302021-08-02T17:40:01+5:30

Congress Vs BJP in Aurangabad : ४ दिवसांपूर्वीच झालेल्या निवडणुकीत केवळ एका मताच्या फरकाने उपसभापती म्हणून कॉंग्रेसमधून भाजपत आलेले अर्जुन शेळके निवडून आले.

Congress-BJP Rada; Arjun Shelke, who joined BJP and became the Deputy Chairman of Panchayat Samiti, was beaten | कॉंग्रेस-भाजपत राडा; भाजपत जाऊन पंचायत समितीचे उपसभापती झालेल्या अर्जुन शेळकेंना मारहाण

कॉंग्रेस-भाजपत राडा; भाजपत जाऊन पंचायत समितीचे उपसभापती झालेल्या अर्जुन शेळकेंना मारहाण

googlenewsNext

औरंगाबाद : औरंगाबादच्या पंचायत समितीमध्ये काँग्रेस आणि भाजप सदस्यांत नुकत्याच झालेल्या उपसभापती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राडा झाला. कॉंग्रेस सोडून भाजपत प्रवेश करत पंचायत समितीचे उपसभापती पद मिळवणाऱ्या अर्जुन शेळके यांना त्यांच्या दालनात मारहाण झाल्याची घटना आज दुपारी घडली. कॉंग्रेसच्या दोन पंचायत समिती सदस्यांसह सात ते आठ कार्यकर्त्यांनी ही मारहाण केल्याची माहिती माजी विधानसभा अध्यक्ष भाजपचे आ. हरिभाऊ बागडे यांनी दिली. ( Arjun Shelke, who joined BJP and became the Deputy Chairman of Aurangabad Panchayat Samiti, was beaten )

अर्जुन शेळके यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. यानंतर ४ दिवसांपूर्वीच झालेल्या निवडणुकीत केवळ एका मताच्या फरकाने उपसभापती म्हणून शेळके निवडून आले. यात काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला. २९ जुलैला रोजी औरंगाबाद पंचायत समितीच्‍या कार्यालयात झालेल्या उपसभापती पदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे अनुराग शिंदे यांना ९ मते तर नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या अर्जुन शेळके यांना १० मते मिळाली. यानंतर सोमवारी दुपारी नूतन उपसभापती अर्जुन शेळके यांच्या दालनात कॉंग्रेसचे दोन सदस्य आणि सात ते आठ जण आले. अचानक त्यांनी शेळके यांच्यावर हल्ला केला. दालनातील खुर्च्या-टेबलची तोडफोड केली. दालनाच्या खिडक्यांची तोडफोड केली. यात शेळके यांच्या डोक्याला मार लागला आहे. 

...त्यांचा नंतर इलाज करू
पराभूत झालेल्या उमेदवाराने मारहाण केल्याची ही पहिलीच घटना असेल. माणुसकीच्या नात्यांनी शेळके यांनी कॉंग्रेस सदस्यांना दालनात बसण्यास खुर्च्या दिल्या. क्षणातच त्यांनी शेळके यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. कॉंग्रेसच्या लोकांनी आता तरी समजून घ्यावे. यामुळेच संपूर्ण देशात कॉंग्रेसची पडझड होत आहे. शेळके यांनी आता स्वतःचा इलाज करावा नंतर हल्लेखोरांचा इलाज करू.
- हरिभाऊ बागडे, आमदार,भाजप

Web Title: Congress-BJP Rada; Arjun Shelke, who joined BJP and became the Deputy Chairman of Panchayat Samiti, was beaten

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.