Comprehensive response in Aurangabad to a bandh called by the 'VBA' | 'वंचित'ने पुकारलेल्या बंदला औरंगाबादमध्ये संमिश्र प्रतिसाद

'वंचित'ने पुकारलेल्या बंदला औरंगाबादमध्ये संमिश्र प्रतिसाद

औरंगाबाद : सुधारित नागरिकत्व कायदा आणि 'एनसीआर'च्या विरोधात  वंचित बहुजन आघाडीने पुकारलेल्या बंदला शुक्रवारी औरंगाबादेत संमिश्र प्रतिसाद मिळाला.

सकाळी पंचवटी हॉटेल चौकात वाळुजकडे जाणाऱ्या शहर वाहतूक बसवर अज्ञात तरुणांकडून दगडफेक करण्यात आली. या घटनेत बसच्या काचा फुटल्या. सुदैवाने कोणाला दुखापत झाली नाही. याप्रकरणी वेदांतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वंचित बहुजन आघाडीचे नेते अमित भुईगळ यांच्या नेतृत्वाखाली शहरातील औरंगपुरा, गुलमंडी, टिळकपथ, पैठणगेट परिसरातील दुकाने बंद करण्यासाठी व्यापाऱ्यांना विनंती करीत कार्यकर्ते फिरत होते. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी नागरिकत्व कायदा आणि 'एनसीआर'च्या विरोधात बंदचे आवाहन केले होते. त्यानुसार काही प्रमुख दलित वसाहतीमध्ये कडकडीत बंद होता, तर अन्य भागात दुकाने, शाळा, महाविद्यालये नियमित सुरु होती. या बंदला शहरात संमीश्र प्रतिसाद मिळाला.

Web Title: Comprehensive response in Aurangabad to a bandh called by the 'VBA'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.