औरंगाबादेत हिंगणघाटची पुनरावृत्ती; घरात घुसण्यास विरोध केल्याने महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2020 08:08 IST2020-02-04T19:39:49+5:302020-02-05T08:08:35+5:30
रविवारी रात्री 11 वाजेच्या दरम्यान घडलेल्या या घटनेत महिला ९५ टक्के भाजली आहे.

औरंगाबादेत हिंगणघाटची पुनरावृत्ती; घरात घुसण्यास विरोध केल्याने महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न
सिल्लोड: घरात एकटी असल्याचे पाहून घरात घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्यास विरोध केल्याने एका 50 वर्षीय महिलेस मारहाण करून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना सिल्लोड तालुक्यातील अंधारी येथे घडली. रविवारी रात्री 11 वाजेच्या दरम्यान घडलेल्या या घटनेत महिला ९५ टक्के भाजली आहे.
त्यांच्यावर औरंगाबाद येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी मंगळवारी दुपारी त्या महिलेचा जबाब घेतला. यावरून अनुसूचित जाती जमाती प्रतिबंध कायदा कलम 307,452,323 अशा विविध कलमांनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलिसांनी घटनेतील आरोपी संतोष सखाराम मोहिते (४० ) यास अटक करण्यात आली आहे.