शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
4
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
5
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
6
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
7
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
8
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
9
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
10
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
11
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
12
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
13
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
14
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
15
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
16
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
17
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
18
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
19
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
20
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेचे कोविड केअर केंद्र सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 05:00 IST

जिल्ह्यात ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत  आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने जिल्हा परिषद व शिक्षक, कर्मचारी संघटनाच्या मदतीने कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. या सेंटरमध्ये १४ कक्षात २० बेड उपलब्ध करून देण्यात आले. त्यापैकी दोन खाटांना ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर बसविण्यात आले. यापुढे आणखी १० बेडचे नियोजन याठिकाणी करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ; आवश्यक उपचार सुविधा, समुपदेशन केंद्र स्थापन

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधासाठी शासन, प्रशासन, आरोग्य विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था आदी यंत्रणा काटेकोर प्रयत्न करीत आहेत. या प्रयत्नांना गती देत आता जिल्हा परिषदेच्या विश्रामगृहात  कोविड केअर तथा समुपदेशन केंद्र सुरू करण्यात आले आहे. 
कोविड केअर सेंटरचा प्रारंभ शुक्रवारी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा परिषद अध्यक्ष बबलू देशमुख, उपाध्यक्ष विठ्ठल चव्हाण, शिक्षण व बांधकाम सभापती सुरेश निमकर, आरोग्य व वित्त सभापती बाळासाहेब हिंगणीकर, महिला व बाल कल्याण सभापती पूजा  आमले, समाजकल्याण सभापती दयाराम काळे, मुख्य कार्यकारी अधिकारी  अविश्यांत पंडा, जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप रणमले आदींच्या उपस्थित करण्यात आला.
जिल्ह्यात ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत  आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने जिल्हा परिषद व शिक्षक, कर्मचारी संघटनाच्या मदतीने कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. या सेंटरमध्ये १४ कक्षात २० बेड उपलब्ध करून देण्यात आले. त्यापैकी दोन खाटांना ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर बसविण्यात आले. यापुढे आणखी १० बेडचे नियोजन याठिकाणी करण्यात येणार आहे. या केंद्राच्या माध्यमातून तातडीच्या वेळी कोरोना रुग्णांवर उपचार केला जाणार आहे. या केंद्रात रुग्णांच्या वैद्यकीय उपचार व देखभालीसाठी एक वैद्यकीय अधिकारी, तीन समुदाय आरोग्य अधिकारी, दोन परिचारिका कार्यरत राहणार आहेत. दीड वर्षांपासून शासन व प्रशासन कोरोनाला रोखण्यासाठी सतत प्रयत्न करीत आहेत. त्यांना साथ देण्यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना व त्रिसूत्रीचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन ना. ठाकूर यांनी नागरिकांना  केले.
म्युकरमायकोसिस संदर्भात जनजागृती
जिल्ह्यात कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तींमध्ये म्युकरमायकोसिस आजाराचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. यावर उपचार करण्यासाठी यंत्रणा उभारण्याबरोबरच जाणीवजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे. आजाराची लक्षणे दिसल्यास घरगुती उपचार करण्यापेक्षा तत्काळ वैद्यकीय तपासणी व  उपचार घ्यावा. वेळीच उपचार केला, तर यातून पूर्णपणे बरे होता येते, असेही पालकमंत्री म्हणाल्या.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल