शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

आता लोकप्रतिनिधी दत्तक घेणार जिल्हा परिषद शाळा

By admin | Updated: March 16, 2015 00:16 IST

इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे वाढते प्रस्थ आणि मराठी शाळांचा घसरलेला दर्जा तसेच मराठी शाळांबद्दल पालकांची बदललेली मानसिकता यावर पर्याय म्हणून ‘लोकप्रतिनिधी ...

मोहन राऊत अमरावतीइंग्रजी माध्यमाच्या शाळांचे वाढते प्रस्थ आणि मराठी शाळांचा घसरलेला दर्जा तसेच मराठी शाळांबद्दल पालकांची बदललेली मानसिकता यावर पर्याय म्हणून ‘लोकप्रतिनिधी शाळा दत्तक योजना’ पुढील शैक्षणिक सत्रापासून राबविण्यात येणार आहे़ या योजनेंतर्गत जिल्ह्यातील आमदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्यांना त्या विभागातील पाच शाळा दत्तक घ्याव्या लागणार आहेत. त्यामुळे या शाळांचा दर्जा सुधारू शकेल. जिल्ह्यात मराठी माध्यमाच्या सोळाशेच्या जवळपास शाळा आहेत. या शाळांच्या बरोबरीने इंग्रजी शाळांची संख्या वाढते आहे. तालुक्याच्या ठिकाणी तीन ते चार इंग्रजी माध्यमांच्या शाळा तसेच तीन हजार लोकसंख्येच्या गावातही इंग्रजी शाळांचे पेव फुटले आहे. मागील चार वर्षांत हा प्रकार वाढीस लागला आहे. आज या संगणक युगात प्रत्येक पालक इंग्रजी शाळांना पसंती देतात. तीन वर्षांच्या मुलाला बालवाडीत न टाकता नर्सरीत प्रवेश दिला जात असल्याने मराठी माध्यमांच्या शाळा ओस पडल्या आहेत.मराठी शाळांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलावा, राज्यातील या मराठी शाळांचा घसरलेला दर्जा वाढावा यादृष्टीने सर्व आमदारांनी त्यांच्या विभागातील मराठी माध्यमाच्या किमान दहा शाळा दत्तक घेऊन योजना’ सुरू करण्याचा निर्णय राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी घेतला आहे़  

जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांची प्रगती साधण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून दर महिन्याला शिक्षण विभागाद्वारे विद्यार्थी गुणवत्ता विकास आढावा घेतला जातो. पुढील शैक्षणिक वर्षापासून जिल्ह्यातील जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्यांनी पुढाकार घेतला तर मराठी शाळांच्या विद्यार्थ्यांची सर्वाधिक प्रगती होईल.- सतीश उईके,अध्यक्ष, जिल्हा परिषद, अमरावती. 

मराठी शाळांसंदर्भात प्रथम पालकांनी आपली मानसिकता बदलणे गरजेचे आहे. आज शिक्षण विभागाने पुढाकार घ्यावा व पालकांनीही आपल्या पाल्यांना मराठी माध्यमांच्या शाळेत पाठविण्याचा आग्रह धरावा. तरच या शाळांना संजीवनी मिळेल. - वीरेंद्र जगताप,आमदार, धामणगाव रेल्वे मतदारसंघ.