डांबर वाहून नेणाऱ्या वाहनाने युवकाला चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:33 IST2021-02-05T05:33:41+5:302021-02-05T05:33:41+5:30

पोलीस सूत्रांनुसार, एमएच २७ ए ३६३६ क्रमांकाचा डांबराचा डम्पर अपघातास कारणीभूत ठरला. या अपघातात शेख अफसर शेख सखावत (४०) ...

The youth was crushed by a vehicle carrying tar | डांबर वाहून नेणाऱ्या वाहनाने युवकाला चिरडले

डांबर वाहून नेणाऱ्या वाहनाने युवकाला चिरडले

पोलीस सूत्रांनुसार, एमएच २७ ए ३६३६ क्रमांकाचा डांबराचा डम्पर अपघातास कारणीभूत ठरला. या अपघातात शेख अफसर शेख सखावत (४०) या युवकाचा जीव गेला. तो रस्त्याच्या कडेला पुरुषोत्तम आमझरे या सहकाऱ्यासोबत दुचाकीवर बसून होता. डम्पर थेट दुचाकीवर गेल्याने शेख अफसर हा चिरडला गेला. या मार्गाने मोठे खड्डे असून, ते बुजविण्याचे कंत्राट खंडेलवाल नामक कंत्राटदाराने घेतले आहे. याच कामावर डम्पर कार्यरत होते. अपघाताची माहिती मिळताच ब्राह्मणवाडा थडीचे ठाणेदार दीपक वळवी, कर्मचारी तसेच इरफान इनामदार, गुड्डू इनामदार आणि अंसार शाह हे ग्रामस्थ घटनास्थळी पोहचले. शिवसेनेने बहाल केलेली रुग्णवाहिका अवघ्या काही क्षणात दाखल झाली आणि मृत शेख अफसर व गंभीर जखमी पुरुषोत्तम आमझरे यांना चांदूर बाजार येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. शवविच्छेदनानंतर शेख अफसरचा मृतदेह नातेवाइकांना सुपूर्द करण्यात आला.

ठाणेदार दीपक वळवी यांनी वाहनचालक कमलेश प्रेमानंद लांडगे (२९, रा. रामजीनगर, नागपूर हल्ली मुकाम कॅम्प, अमरावती) याला अटक केली. त्याच्याविरुद्ध भादंविचे कलम २७९, ३३७, ३०४ अ व सहकलम १२०/१७७, १०४/१७७ मोटार वाहन कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहआरोपी वाहनमालक खंडेलवाल याचा शोध पोलीस घेत आहेत.

Web Title: The youth was crushed by a vehicle carrying tar