शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

आजपासून युवा जल्लोष!

By admin | Updated: September 18, 2014 02:22 IST

अमरावती विद्यापीठाचा युवा महोत्सवात चार दिवस तरूणाईचा कलाविष्कार.

अकोला : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा वार्षिक युवा महोत्सव १८ ते २१ सप्टेंबरदरम्यान अकोल्यातील शिवाजी महाविद्यालयात आयोजित करण्यात आला आहे. चार दिवस चालणार्‍या या युवा महोत्सवात अमरावती विभागातील पाच जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थी सांस्कृतिक आविष्कारांचे सादरीकरण करणार आहेत. शिवाजी महाविद्यालयाला युवा महोत्सवाच्या आयोजनाची दुसर्‍यांदा संधी मिळाली आहे. अमरावती विद्यापीठाच्या शारीरिक शिक्षण व रंजन मंडळाच्यावतीने विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, यासाठी दरवर्षी युवा महोत्सवाचे आयोजन केले जाते. यावर्षी १८ ते २१ सप्टेंबर असा चार दिवस युवा महोत्सव अकोल्यातील शिवाजी महाविद्यालयात रंगणार आहे. २00८ नंतर पुन्हा एकदा अकोला शहराला युवा महो त्सवाचे आयोजन करण्याचा मान मिळाला आहे. अमरावती विभागातील अमरावतीसह अकोला, बुलडाणा, यवतमाळ व वाशिम जिल्ह्यातील ३५0 महाविद्यालयांतील जवळपास ५ हजार विद्यार्थी २३ कलाविष्कारांचे सादरीकरण करणार आहेत. विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे मूल्यमापन करण्यासाठी ६0 प्रज्ञावंत व अनुभवी परीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे.