शहरं
Join us  
Trending Stories
1
Virat Kohli Century : किंग कोहलीचा 'शतकी रोमान्स'! रायपूरच्या मैदानातही विक्रमांची 'बरसात'
2
"भारताचे तुकडे झाले, तरच...!"; बांगलादेशच्या माजी लष्करी अधिकाऱ्याचे विषारी फुत्कार, कोण आहे अब्दुल्लाहिल अमान आजमी?
3
मोठी उलथापालथ! ओला इलेक्ट्रीक रसातळाला पोहोचली; नोव्हेंबरच्या रेसमध्ये बाहेर फेकली गेली 
4
मोठी बातमी! 26/11 हल्ल्यावेळी दहशतवाद्यांशी लढलेले IPS अधिकारी सदानंद दाते राज्याचे नवे पोलीस महासंचालक
5
तुमचे पैसे SBI, HDFC किंवा ICICI बँकेत असेल तर खुशखबर! RBI ने 'या' ३ बँकांसाठी केली मोठी घोषणा
6
ॲपलचा विरोध, विरोधकांचाही विरोध! केंद्राचा  'संचार साथी' ॲपवर यू-टर्न, प्री-इंस्टॉल करण्याची अनिवार्यता मागे घेतली...
7
५ मुलांची आई भंगारवाल्याच्या प्रेमात पडली! वयाचाही विचार केला नाही; पतीसमोर बांधली दुसरी लग्नगाठ
8
Ruturaj Gaikwad Maiden Century : पुणेकरानं संधीचं सोनं करुन दाखवलं! या कारणामुळं ऋतुराजची पहिली सेंच्युरी ठरते खास
9
काय सांगता? फक्त स्वत:ला पाहण्यासाठी नाही तर 'या' कारणांसाठी लिफ्टमध्ये असतो आरसा
10
सांगलीतील आष्ट्यातील स्ट्राँगरुमबाहेर महाविकास आघाडीचा गदारोळ; मतांच्या आकडेवारीत तफावत, सुरक्षा नसल्याचाही दावा
11
अल-फलाहचा बनावट कारभार! रोज तयार व्हायची १००-१५० बोगस रुग्णांची यादी; विरोध केल्यास हिंदू कर्मचाऱ्यांचा पगार कापायचे
12
"कपडे घालून या नाहीतर गोळ्या घालू..."; जैन मुनींशी गावगुंडाचे असभ्य वर्तन, समाज संतप्त
13
श्रद्धा कपूरने बॉयफ्रेंड राहुल मोदीला हाताने भरवली 'जापानी डिश', व्हिडीओ व्हायरल
14
पुतीन भारतात येण्यापूर्वी रशियाकडून मोठी भेट...! रशियन लष्करी तळ वापरता येणार, त्यांच्या संसदेची मंजुरी...
15
दिल्ली कार स्फोटातील मुख्य आरोपी जसीरच्या कोठडीत वाढ! NIA आणखी चौकशी करणार; नेमके आरोप काय? 
16
Gold Silver Price Today: चांदी ऑल टाईम 'हाय'वर; सोन्याच्या दरातही मोठी तेजी; खरेदी करणार असाल तर खिसा करावा लागेल रिकामा
17
'मुंबई इंडियन्स'ने संघात घेताच कर्णधार शार्दुल ठाकूरचा धमाका; ७ चेंडूत घेतले ४ बळी
18
फार्मा क्षेत्रातील दुसरी सर्वात वेगवान वाढणारी कंपनी IPO आणतेय; एका लॉटसाठी किती पैसे लागणार?
19
सावधान! आईस्क्रीम, च्युइंगम, शुगर फ्री प्रोडक्टमुळे लिव्हर खराब; खाण्याआधी एकदा 'हे' वाचाच
Daily Top 2Weekly Top 5

एकतर्फी प्रेमातून तरुणाने चिरला तरुणीचा गळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 21:45 IST

एकतर्फी प्रेमातून एका तरुणाने भरदिवसा तरुणीची गळा चिरल्याची धक्कादायक घटना सोमवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास खोलापुरी गेट ठाण्यामागील रस्त्यावर घडली. शिवानी सुनील वासनकर (१९, रा. तारखेडा) असे गंभीर जखमी तरुणीचे नाव असून, तिला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेने शहरात प्रचंड खळबळ उडाली.

ठळक मुद्देखोलापुरी गेट ठाण्यामागे भरदिवसा थरार : जखमीवर उपचार सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : एकतर्फी प्रेमातून एका तरुणाने भरदिवसा तरुणीची गळा चिरल्याची धक्कादायक घटना सोमवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास खोलापुरी गेट ठाण्यामागील रस्त्यावर घडली. शिवानी सुनील वासनकर (१९, रा. तारखेडा) असे गंभीर जखमी तरुणीचे नाव असून, तिला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेने शहरात प्रचंड खळबळ उडाली.याप्रकरणी अक्षय पुरुषोत्तम कडू (२२, रा. शिरजगाव बंड) याला खोलापुरी गेट पोलिसांनी अटक केली. जखमी शिवानी व अक्षय हे दोघेही एकमेकांचे नातेवाईक असून, आरोपी हा शिवानीवर प्रेम करायचा. शिवानी ही राजापेठ स्थित एका महाविद्यालयात बी.कॉम.चे शिक्षण घेत आहे. अक्षय हा नेहमीच तिचा पाठलाग करून त्रास देत होता. सोमवारी दुपारी शिवानी कॉलेज आटोपून मैत्रिणीसोबत घरी जात होती. दरम्यान अक्षयने तिला खोलापुरी गेट पोलीस ठाण्याच्या मागील शुकशुकाट असणाऱ्या रोडवरच गाठले. तिचा ठाम नकार पाहून अक्षयचा राग अनावर झाला आणि त्याने चाकूने तिच्या गळ्यावर वार केले. शिवानीच्या आरडाओरडीने परिसरातील नागरिक बाहेर आले. एका व्यक्तीने घटनेची माहिती तात्काळ खोलापुरी गेट पोलिसांना दिली. पोलीस पोहोचेपर्यंत शिवानीचे नातेवाइकसुद्धा घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तात्काळ शिवानीला राजापेठ हद्दीतील खासगी रुग्णालयात दाखल केले. तिची प्रकृती नाजूक असल्याचे सांगण्यात येत आहे.रक्तबंबाळ पडलेल्या शिवानीकडे पाहून तो हसत होताखोलापुरी गेट हद्दीत भरदिवसा घडलेली ही थरारक घटना अनेकांनी बघितली. अक्षयने शिवानीचा गळा कापल्यानंतर ती खाली कोसळली. त्यानंतर अक्षय हा तिच्याजवळ बसून हासत होता, अशी माहिती काही नागरिक सांगत आहेत. त्यावेळी एखाद्या विकृतासारखी त्याचे वर्तन होते. त्याला पोलिसांनी घटनेच्या काही वेळातच अटक केली. त्याला वैद्यकीय तपासणीसाठी इर्विनला आणण्यात आले. त्यावेळीही त्याने हसतच घटनाक्रम कथन केला.प्रेमप्रकरणातून तरुणाने धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केला. ठाण्यामागेच ही घटना घडली असून, पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केली. जखमी तरुणीवर उपचार सुरु आहेत.- अतुल घारपांडेपोलीस निरीक्षक