शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सची १० वर्षांनी स्वप्नपूर्ती! गौतम गंभीरनं केला कुणालाच न जमलेला करिष्मा
2
पुण्यातून भाजपला कितीचं लीड मिळणार?; मुरलीधर मोहोळांनी सांगितला आकडा  
3
व्वा! मानलं आजी...साठीच्या वयात दिली परीक्षा अन् पटकावले ९८ टक्के गुण! 
4
केकेआरच्या बॉलर्सनी बुकींच्या तिजोरीत ओतली कोट्यवधींची गंगाजळी
5
Kavya Maran रडली, पण SRH च्या खेळाडूंचे मनोबल उंचावण्यासाठी रोखला अश्रूंचा बांध, Video 
6
मतमोजणीवेळी बीडमधील 'या' अधिकाऱ्यांना दूर ठेवा; बजरंग सोनवणेंची निवडणूक आयोगाकडे मागणी
7
हैदराबादची हाराकिरी, विराट कोहलीची चांदी! IPL इतिहासात नोंदवला विक्रम भारी 
8
आयर्लंडला जाणारी कतार एअरवेजची फ्लाइट टर्ब्युलन्समध्ये अडकली, 12 जखमी...
9
'रेमल' चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट; पंतप्रधान मोदींनी बोलावली आढावा बैठक
10
KKR vs SRH Final : मिचेल स्टार्कने टाकला Ball of the season! हैदराबादचे ३ फलंदाज तंबूत, Video 
11
मिचेल स्टार्कमुळे जान्हवी कपूर निराश झाली; तिचा Video पाहून बेस्ट ॲक्टिंग पुरस्काराची होतेय मागणी 
12
राजस्थानमध्ये भीषण गरमी; भारत-पाक बॉर्डरवर 55 डिग्री तापमानात BSF जवानांची देशसेवा...
13
भांग पिऊन विमानात चढला अन्..., IndiGo फ्लाइटमध्ये प्रवाशाचा गोंधळ!
14
घरोघरी जात दूध विकलं; मजुरी करणाऱ्या 'त्याने' आज ८०० कोटींचा व्यवसाय उभारला
15
ओडिशात भाजपा उमेदवारावर ईव्हीएमची तोडफोड केल्याचा आरोप, तुरुंगात रवानगी
16
रिषभ पंत आनंदाने केक भरवायला गेला अन् रोहित शर्माने नकार दिला, म्हणाला... Video Viral  
17
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना मोठा धक्का, निवडणुकीपूर्वी 78 नेत्यांनी साथ सोडली
18
धोखेबाज नवरदेव! २ बायका फजिती ऐका; तिसरे लग्न करताना 'डाव' फसला, दोन्ही पत्नींची एन्ट्री
19
टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास मी तयार, पण...; गौतम गंभीरची BCCI समोर अट 
20
"सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न"; वडेट्टीवार म्हणतात, " आता तरी सेटलमेंट..."

एसटीने चिरडल्याने तरुणाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2019 6:00 AM

बडनेरा रेल्वे उड्डाणपुलाच्या दोन्ही उतारांना अपघाताची वाढती संख्या पाहता, तेथे गतिरोधके लावण्यात आली आहेत. तरीही अपघातांना आळा घालता आलेला नाही. शुक्रवारी सकाळी जुनी वस्तीतील माळीपुरा येथील रहिवासी शुभम वाठ हा काही कामानिमित्त नवी वस्तीत एमएच २७ सीजी ३९२४ या क्रमांकाच्या दुचाकीने गेला होता.

ठळक मुद्देचालक ताब्यात : गांधी विद्यालयाजवळ अपघात

बडनेरा : भरधाव एसटीखाली चिरडल्याने एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी जुनीवस्ती स्थित गांधी विद्यालयाजवळील मुख्य मार्गावर घडली. शुभम अविनाश वाठ (१७) असे मृताचे नाव आहे. अपघातप्रकरणी बडनेरा पोलिसांनी बसचालकास अटक केली. एसटी बस जप्त करण्यात आली आहे.बडनेरा रेल्वे उड्डाणपुलाच्या दोन्ही उतारांना अपघाताची वाढती संख्या पाहता, तेथे गतिरोधके लावण्यात आली आहेत. तरीही अपघातांना आळा घालता आलेला नाही. शुक्रवारी सकाळी जुनी वस्तीतील माळीपुरा येथील रहिवासी शुभम वाठ हा काही कामानिमित्त नवी वस्तीत एमएच २७ सीजी ३९२४ या क्रमांकाच्या दुचाकीने गेला होता. काम आटोपून परत दुचाकीने येताना रेल्वे उड्डाणपुलावरून जुनी वस्तीतील गांधी विद्यालयाकडे वळण घेत असताना शुभमच्या दुचाकीला अमरावतीहून नेरकडे जाणाऱ्या एसटी बस (एमएच ४० वाय ५२८७) ने जबर धडक दिली. शुभम एसटीच्या मागील चाकात आला. त्याच्या डोक्यावरून एसटीचे चाक गेले. यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.भरदिवसा घडलेल्या या अपघातामुळे दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती. बघ्यांची प्रचंड गर्दी अपघातस्थळी जमली. घटनेच्या माहितीवरून तेथून काही अंतरावर असणाºया बडनेरा ठाण्यातील पोलीस घटनास्थळी धावून गेले. पोलिसांनी एसटी चालकास ताब्यात घेऊन शुभमचा मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात नेला.शुभमचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शवगारात ठेवण्यात आला आहे. त्याच्या मृत्यूमुळे बडनेरातील जुनी वस्ती परिसरात शोककळा पसरली आहे. पोलिसांनी बसचालकाविरुद्ध गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू