शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
3
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
4
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
5
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
6
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
7
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
8
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
9
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
10
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
11
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
12
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
13
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
14
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
15
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
16
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
17
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
18
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
19
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
20
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय

...अन् अल्पवयीन बालिकेचा नियोजित विवाह यशोमती ठाकूर यांनी वेळीच रोखला!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2021 10:51 PM

Yashomati Thakur : बुलडाणा जिल्ह्यातील १४ वर्षीय अल्पवयीन बालिकेचे लग्न लावण्यासाठी नियोजन करून गुजरात गाठण्यात आले होते.

अमरावती  : चौदा वर्षाच्या बालिकेचा गुजरातमध्ये नियोजित विवाह महाराष्ट्राच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्या आदेशाने तत्पर कृती करून वेळीच रोखण्यात आला. बुलडाणा जिल्ह्यातील १४ वर्षीय अल्पवयीन बालिकेचे लग्न लावण्यासाठी नियोजन करून गुजरात गाठण्यात आले होते. (Yashomati Thakur stopped the planned marriage of minor girl on time!)

गुजरातमधील जोलवा येथे हा विवाह होणार होता. याबाबत माहिती मिळताच महिला व बालविकास मंत्री श्रीमती ठाकूर यांनी महाराष्ट्र राज्य बाल संरक्षण संस्था व बुलडाणा जिल्हा बाल संरक्षण कक्ष बुलडाणा यांना तत्काळ कारवाईचे निर्देश दिले व गुजरातमधील यंत्रणेलाही सूचित केले. याबाबत १०९८ हेल्पलाईनवरही तक्रार प्राप्त झाली होती. महिला व बाल विकास मंत्री यांच्या तत्काळ कार्यवाहीमुळे दोन्ही राज्यातील बाल संरक्षण यंत्रणा सक्रिय होऊन आज नियोजित असलेला बालविवाह थांबविण्यात यश आले आहे.

महाराष्ट्र राज्य बाल संरक्षण संस्था कार्यक्रम व्यवस्थापक यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बाल संरक्षण कक्ष बुलडाणा यांनी गुजरात चाइल्ड लाईन आणि बाल संरक्षण कक्ष व जोलवा येथील बाल विवाह प्रतिबंध अधिकारी जोलवा यांच्या मदतीने गुजरात राज्यातील जोलवा, दहेज पोलिस स्टेशन अंतर्गत प्रत्यक्ष उपस्थित राहून ही बाल विवाह प्रतिबंध कार्यवाही करण्यात केली आहे.

बाल विवाह प्रतिबंध अधिनियम 2006 नुसार बालिकेच्या पुनर्वसनासाठी व पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याची माहिती जिल्हा बाल संरक्षण कक्ष जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाने कळविले आहे.

टॅग्स :Yashomati Thakurयशोमती ठाकूरmarriageलग्नbuldhanaबुलडाणाAmravatiअमरावतीGujaratगुजरातCrime Newsगुन्हेगारी